Mhada home : दिवाळीआधी म्हाडाचा धमाका; मुंबईतील ३ ठिकाणी ६००० स्वस्त घरांची लॉटरी

Mumbai housing scheme News: मुंबईकरांना घर घेण्याची संधी मिळणार आहे. कारण सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये गोरेगाव, विक्रोळी आणि बोरिवलीत ५ ते ६ हजार घरांची म्हाडा लॉटरी जाहीर होणार आहे.
MHADA Housing Lottery
MhadaSaam tv
Published On

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

MHADA lottery Mumbai 2024: मुंबईमध्ये घर घेण्याचा विचार करणाऱ्या सर्व सामान्यांना म्हाडाकडून आनंदाची बातमी देण्यात आली आहे. मुंबईमध्ये पाच ते सहा हजार घरांची लॉटरी निघणार असल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैयस्वाल यांनी दिली आहे. मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना जैयस्लवाल यांनी म्हाडाचा पुढील प्लानिंगबाबात माहिती दिली. त्यामध्ये मुंबईमध्ये पुढील काही दिवसांत पाच ते सहा हजार घरांची लॉटरी काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दिवाळी पूर्वी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात निघणार पाच ते हजार घरांची लॉटरी काढणार आहोत. मुंबईच्या गोरेगाव, विक्रोळी, बोरिवली परिसरात घरे असतील, असे संजीव जैयस्वाल यांनी सांगितले. 'मागील दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये १३ लॉटरी काढल्या आहेत. त्यामध्ये ३० हजार घरे उपलब्ध करून दिली आहेत. त्यामध्ये मुंबईमध्ये पाच ते सहा हजार घरांचा समावेश होता. दिवाळीआधी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये मुंबईतील घरांसाठी लॉटरी काढण्याचा प्लान आहे. त्यामध्ये साधारणपणे पाच हजार घरे असतील, असे जैयस्वाल म्हणाले.ट

MHADA Housing Lottery
Bullet Train : २०२८ पर्यंत बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

म्हाडाच्या या उपक्रमामुळे मुंबईतील मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न गटातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात स्वतःचे घर मिळण्याची संधी आहे. यापूर्वीच्या लॉटरींना मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे यंदाही मोठ्या संख्येने अर्ज येण्याची अपेक्षा आहे. म्हाडाच्या लॉटरीची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. म्हाडाचे उपाध्यक्ष जैयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या आधी मुंबईमध्ये म्हाडाच्या घराची लॉटरी निघणार आहे. म्हाडाच्या घरासाठी अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष आणि अन्य तपशील लवकरच म्हाडाकडून अधिकृत जाहीर करण्यात येणार आहे.

MHADA Housing Lottery
Pune : मित्रांसोबत फिरायला गेला अन् माघारी परतलाच नाही, मुळशी धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

यंदा पुन्हा एकदा मुंबईकरांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्यासाठी ५ हजार घरांची लॉटरी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही लॉटरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईडब्ल्यूएस), अल्प उत्पन्न गट (एलआयजी), मध्यम उत्पन्न गट (एमआयजी) आणि उच्च उत्पन्न गट (एचआयजी) या सर्व प्रवर्गांसाठी असेल.

MHADA Housing Lottery
Navi mumbai Cidco : २५ लाखांत घर, सिडको धमाका उडवणार, ६७२३५ घरं तयार, लॉटरी कधी निघणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com