Mira Bhayandar : स्वीमिंग पूलमध्ये बुडून ११ वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू, वडिलांची मनपा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सवर कारवाईची मागणी

Gopinath Munde Sports Complex Swimming Pool Boy Drowns to Death : गोपीनाथ मुंडे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या स्वीमिंग पूलमध्ये ११ वर्षीय ग्रंथ हसमुख मुथा या चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी सकाळी घडली आहे.
Mira Bhayandar Municipal Corporation Sports Complex
Mira Bhayandar Municipal Corporation Sports ComplexSaam TV News
Published On

ठाणे : पालघर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोहायला गेलेल्या एका तरुणाचा बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत एक विद्यार्थी कालव्याच्या पाण्यात वाहून गेल्याने बेपत्ता झाला आहे. पालघर तालुक्यातील मासवण येथील सूर्या नदीच्या बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या अभिषेक बिऱ्हाडे(वय २४) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. तर डहाणू तालुक्यातील सारणी येथे कालव्याच्या पाण्यात दक्ष मर्दे हा विद्यार्थी वाहून गेल्यानं बेपत्ता झाला आहे. या घटेनला एक दिवस उलटत नाही तोवर भाईंदर पूर्व येथील गोल्डनेस्ट परिसरातील मनपा संचलित दिवंगत गोपीनाथ मुंडे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या स्वीमिंग पूलमध्ये ११ वर्षीय ग्रंथ हसमुख मुथा या चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी सकाळी घडली आहे.

ग्रंथ हा नेहमीप्रमाणे सकाळी पोहण्यासाठी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये गेला होता. काही वेळातच तो पाण्यात दिसेनासा झाला. परंतु त्या वेळी पूल परिसरात उपस्थित प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी वेळेवर लक्ष न दिल्यानं कुणालाच तो नसल्याचं जाणवून आलं नाही. काही वेळाने तो पाण्यात बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्यानंतर तातडीने त्याला भाईंदरमधील तुंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर मृत घोषित केलं.

Mira Bhayandar Municipal Corporation Sports Complex
ये पप्पा, ये पप्पा म्हणाली...; पोटच्या लेकीचा मृत्यू, आई बापाचा काळीज चिरणारा आक्रोश, अख्खं सोलापूर हळहळलं

आपल्या लेकाचा पोहोताना मृत्यू झाल्याची बातमी समजताच मुथा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ग्रंथच्या वडिलांनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणालाच या घटनेचं कारण ठरवत कठोर कारवाईची मागणी केली आहे. ११ वर्षीय चिमुकल्याच्या अकस्मात मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. समाजातील अनेक सदस्य तुंगा हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन पीडित कुटुंबाला धीर देत होते.

घटनेची माहिती मिळताच भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनीही तात्काळ तुंगा हॉस्पिटलमध्ये जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली व सांत्वन केलं. मनपा संचलित स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये अशी दुर्घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधित जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून मनपाकडून देखील चौकशीची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.

Mira Bhayandar Municipal Corporation Sports Complex
Palghar News : बंधाऱ्यात पोहायला गेला अन् जीव गमावला, एक विद्यार्थी बेपत्ता; पालघरमध्ये खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com