Sakal Exit Poll: मीरा-भाईंदर मतदारसंघातून नरेंद्र मेहता होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Mira-Bhayandar Assembly Election Exit Poll Result: मीरा-भाईंदर मतदारसंघामध्ये नरेंद्र मेहता आणि गीता जैन यांच्यात प्रमुख लढत झाली. या मतदारसंघामध्ये भाजपाचं पारडं जड असल्याचे दिसून येत आहे.
Mira-Bhayandar Assembly Election Exit Poll Result
Mira-Bhayandar Constituency
Published On

सध्या महाराष्ट्रात काल २० नोव्हेंबर रोजी सर्वत्र विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. २३ तारखेला मतमोजणाी होणार आहे. यासंदर्भात सकाळ समूहाचा एक्झिट पोल समोर आला आहे. मीरा-भाईंदर मतदारसंघातून भाजपाचं पारडं जड दिसतंय. त्यामुळे याठिकाणी नरेंद्र मेहता यांना जास्तीत जास्त मत मिळण्याची शक्यता आहे. नरेंद्र मेहता याठिकाणी निवडून येऊ शकतात.

मीरा-भाईंदर मतदारसंघामध्ये भाजपाकडून नरेंद्र मेहता निवडणूक लढत आहेत. तर अपक्ष म्हणून गीता जैन हे निवडणुकीच्या रिंगणात होते. या मतदारसंघात सकाळच्या एक्झिट पोलनुसार, नरेंद्र मेहता हे संभाव्य आमदार होऊ शकतात. तर गीता जैन यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. अपक्ष या गीता जैन आधी २०१९ च्या आमदार होत्या.

यावेळी अनेक चढाओढ झाली आणि नरेंद्र मेहता आणि गीता जैन यांच्यामध्ये नेमकं कोण निवडून येणार यामध्ये नरेंद्र मेहता यांनी बाजी मारली आणि त्यांना भाजपाने उमेदवारी दिली. गीता जैन यांनी सांगितले कदाचित अपक्ष असणं हे माझ्या नशिबातच आहे. त्यांनी पहिली निवडणूक सुद्धा अपक्ष म्हणून लढवली होती आणि त्या सत्ते आल्या होत्या. पक्षाने जरी जबाबदारी दिली नाही तरीसुद्धा मी माघार हटणार नाही असं त्या म्हणाल्या होत्या. गीता जैन यांनी नरेंद्र मेहता यांचा राक्षस म्हणून उल्लेख केला होता तो सुद्धा खूप गाजला होता. काल मतदानाच्या दिवशीसुद्धा नरेंद्र मेहता आणि गीता जैन यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. या दोन्हींच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता.

Mira-Bhayandar Assembly Election Exit Poll Result
Sakal Exit Poll: ठाणे मतदारसंघातून संजय केळकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. याठिकाणी महायुती तर्फे भाजपाचे नरेंद्र मेहता आणि महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे मुजफ्फर हुसैन आणि अपक्ष आमदार गीता जैन निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हा मतदारसंघ एकेकाळी भाजपाचा बालेकिल्ला म्हणून मानला जात होता. २०१४ मध्ये याठिकाणी भाजपाचे नरेंद्र मेहताजी झाले २०१९ मध्ये भाजपाच्याच बंडखोर असलेल्या गीता जैन या विजयी झाल्या. आता हे दोन्ही उमेदवार पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उभे आहेत.

Mira-Bhayandar Assembly Election Exit Poll Result
Sakal Exit Poll: भोर मतदारसंघातून संग्राम थोपटे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com