Ravindra Chavan: 'कंत्राटदारांना धडा शिकवणार'; मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावरून मंत्री रवींद्र चव्हाण यांचा इशारा
अभिजीत देशमुख
Ravindra Chavan Latest News
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत आयोजित मुंबई गोवा महामार्गावरील प्रश्नांवर चर्चासत्र आयोजित केले. 'कंत्राटदारांना लोकांबद्दल आपुलकी नाही. या सगळ्यांना धडा शिकवणार, असा इशारा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भरकार्यक्रमात दिला. (Latest Marathi News)
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत आयोजित केलेल्या चर्चासत्रात कोकणातील सामाजिक संस्था संघटना मुंबई, कल्याण डोंबिवली उपनगरात कार्यरत सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमात मंत्री चव्हाण म्हणाले, कामात दिरंगाई का झाली याबाबत बोलताना माझ्यात ताकद आहे धमक आहे. जो कोणी या रस्त्याच्या आड येईल त्याला सोडणार नाही हे विधानसभेच्या सभागृहात सांगणारा रवींद्र चव्हाण होता'.
'माझी या रस्त्यावर जागा नाही किंवा तिथे हॉटेल बनवणार नाही. माझा कोकणवासीय तीळ तीळ करतोय. रत्नागिरीमधल्या एका कंत्राटदाराच्या तीन वेळा त्याच्या घरी गेलो, नाव घेणार नाही. त्याची पात्रता नाही. यांना लोकांबद्दल आपुलकी नाही. या सगळ्यांना धडा शिकवणार. एकदा रस्ता होऊन जाऊ दे, मग बघू ना कोण कोणी काय-काय केलेय. मी पण कोकणातलाच आहे, असेही मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले.
तत्पूर्वी, या चर्चासत्र कार्यक्रमात उपस्थित कोकणवासीयांनी मुंबई-गोवा महामार्गाबाबत सूचना केल्या तर या सूचनाबाबत आवश्यक ते प्रयत्न करणार असल्याचे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. तसेच मुंबई-गोवा महामार्गात पर्यायी रस्ते देखील तयार असल्याचे यावेळी रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.