Raj Thackeray News: 'वर्षानुवर्षे रस्ता का होत नाही', मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावरून राज ठाकरे कडाडले

Mumbai Goa Highway News: 'वर्षानुवर्षे रस्ता का होत नाही', मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावरून राज ठाकरे कडाडले
Raj Thackeray News
Raj Thackeray NewsSaam Tv
Published On

Raj Thackeray News: ''नितीन गडकरी हे त्यावेळी पीडब्लूडी मिनिस्टर होते. त्यांच्या पुढाकाराने मुंबई-पुणे रस्ता झाला. त्यावेळी आपल्या देशाला कळलं, असा रस्ता होऊ शकतो आणि मग देशात चांगले रस्ते व्हायला सुरुवात झाली. ज्या महाराष्ट्राने हा आदर्श घालून दिला, त्याच महाराष्ट्रातील मुंबई-गोवा रस्ता हा असा आहे.'' असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत.

रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेकडून जागर यात्रा काढण्यात आली आहे. यातच कोकणातील कोलाड येथे आयोजित सभेत राज ठाकरे असं म्हणाले आहेत. ते म्हणाले की, ''हा रस्ता असा का आहे? यात असे खड्डे का आहेत? 17 वर्ष झाली, हा रस्ता का होत नाही आहे.''

Raj Thackeray News
Breaking News: 'NDA' मधील चार घटक पक्ष India आघाडीत सामील होणार, काँग्रेसचा मोठा दावा

''पहिल्यांदा हात जोडून आणि नंतर हात सोडून बोलायचं''

सरकारला लक्ष्य करत राज ठाकरे म्हणाले की, ''सरकारला जाग यावी म्हणून तुम्ही सगळ्यांनी पदयात्रा केलीत. पदयात्रा हा सभ्य मार्ग असतो. आपल्या पक्षाचं तसंच धोरण आहे, पहिल्यांदा हात जोडून आणि नंतर हात सोडून बोलायचं असतं.''  (Latest Marathi News)

राजा ठाकरे पुढे म्हणाले, ''ज्या-ज्या महाराष्ट्र सैनिकांनी आणि कोकणी बांधवांनी पदयात्रेमध्ये सहभाग नोंदवला, त्यांचे मी आभार मानतो. अमित आणि पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी परिश्रम घेतले आहेत. कोकणी बांधवांना आणि भगिनींना मागील अनेक वर्षांपासून खड्डे सहन करावे लागत आहेत. याचा राग कसा येत नाही?''

Raj Thackeray News
Chandrayaan 3 News Update: विक्रम लँडरने लावला पहिला मोठा शोध, जाणून घ्या चंद्रावर काय मिळालं खास...

राज ठाकरे पुढे म्हणाले की, ''हा रस्ता असा ठेवण्यामागे सगळ्यात महत्त्वाचं कारण कोकणी बांधवांच्या जमिनी विकत घेतल्या जात आहेत. ज्यावेळी रस्ता होईल तेव्हा शंभर पट भावाने व्यापाऱ्यांना जमिनी विक्री होतील, तुम्हाला काहीही मिळणार नाही. रस्ता चांगला झाल्यानंतर आजूबाजूच्या जमिनींचे भाव काय होतात? हे समजून घ्या. जमिनी विकू नका, तशाच ठेवा पुढे तुम्हाला फायदा होईल.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com