Chandrayaan 3 News Update: विक्रम लँडरने लावला पहिला मोठा शोध, जाणून घ्या चंद्रावर काय मिळालं खास...

Vikram Lander First Observations: विक्रम लँडरने लावला पहिला मोठा शोध, जाणून घ्या चंद्रावर काय मिळालं खास...
Vikram Lander First Observations
Vikram Lander First ObservationsSaam Tv
Published On

Chandrayaan-3 latest updates: भारताच्या चांद्रयान-3 ने चंद्राविषयी माहिती देण्यास सुरुवात केली आहे. अशातच विक्रम लँडरने चंद्राविषयी एक महत्वाच्या गोष्टीचा शोध लावला आहे. चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरने ChaSTE पेलोडचा प्रारंभिक डेटा इस्रोला पाठवला आहे. इस्रोने याबाबत ट्विटरवर माहिती शेअर केली आहे.

इस्रोने सांगितले की, चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमान जाणून घेण्यासाठी लँडर विक्रमवर बसवलेल्या लुनर सरफेस थर्मोफिजिकल एक्सपेरिमेंट (ChaSTE) पेलोडवरून पहिले निरीक्षण आम्हाला मिळालं आहे.

Vikram Lander First Observations
Uddhav Thackeray Hingoli Sabha: 'पंतप्रधानांना राखी बांधली आणि कारवाई थांबली', उद्धव ठाकरेंची भावना गवळींवर टीका

इस्रोने याबाबत माहिती शेअर करताना एक आलेखही शेअर केला आहे. इस्रोने माहिती दिली आहे की, आलेखात शोध मोहिमेदरम्यान नोंदवल्याप्रमाणे चंद्राच्या पृष्ठभागावर किंवा पृष्ठभागाच्या तापमानातील भिन्नता दर्शवितो.  (Latest Marathi News)

चंद्राच्या दक्षिण ध्रुवाबद्दल अशी ही पहिलीच माहिती आहे. त्याचा सविस्तर अभ्यास अजून सुरु आहे. ChaSTE पेलोड खोलवर जात असताना इस्रोने जारी केलेला आलेख चंद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानातील चढउतार दाखवतो.

Vikram Lander First Observations
Maharashtra Rain Forecast : सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये राज्यात पावसाचं प्रमाण कसं असेल? हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो?

विक्रम लँडरवर बसवण्यात आलेला ChaSTE दक्षिण ध्रुवाभोवती चंद्राच्या मातीचे तापमान मोजते. त्याच्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागाचे थर्मल गणित समजू शकते. ChaSTE पेलोड हे एक तापमान मोजण्याचे यंत्र आहे, जे एक नियंत्रित प्रवेश यंत्रणेच्या मदतीने 10 सेमी खोलीपर्यंत पोहोचू शकते.

पेलोडमध्ये 10 भिन्न तापमान सेन्सर आहेत. इस्त्रोने शेअर केलेला आलेख वेगवेगळ्या खोलीवर नोंदलेल्या चंद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानातील फरक दर्शवतो. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. असे करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com