Beed : १९ दुचाकी वरून ५० जण आले, रात्रीच्या अंधारात कुटुंबावर जीवघेणा हल्ला; CCTV फुटेज आले समोर

Beed Crime : शाहूनगर, बीडमधील गजानन कॉलनीत १९ दुचाकींवर ४५–५० तरुणांनी आडागळे कुटुंबावर मध्यरात्री चाकू- दगडाने धाक दाखवून भयंकर हल्ला केला. कुटुंबातील दोघे गंभीर जखमी; पोलिसांनी आरोपींना अटक करून कडक कारवाईची तयारी सुरू केली आहे.
Beed News
beed newsSaam Tv
Published On

बीडमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना. ही घटना ताजी असतानाच बीड मध्ये पुन्हा एकदा तरुणांची गुंडगिरी पाहायला मिळाली. दोन दिवसांपूर्वी बीडमधील शाहूनगर भागातील गजानन कॉलनीत आडागळे कुटुंबावर दगडाने मारहाण करत चाकूचा धाक दाखवत हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात कुटुंबातील दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता १९दुचाकी गाड्यांवर ४५ ते ५० हल्लेखोर आले असल्याचे समोर आले. या प्रकरणांत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.

बीड मधील शाहूनगर भागातील गजानन कॉलनीत राहणाऱ्या अडागळे कुटुंबावर दोन दिवसांपूर्वी हल्ला झाला. हा हल्ला रात्री १२ च्या सुमारास झाला. तरुणांमध्ये बाहेर झालेल्या किरकोळ वादानंतर काही टोळक्याने अडागळे यांच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवत तुमचा मुलगा कुठे आहे? असा प्रश्न विचारत अडागळे कुटुंबावर हल्ला केला. या हल्ल्यात अडागळे कुटुंबातील दोघे जण जखमी झाले. या दोघांवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून याप्रकरणी अडागळे कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी या संदर्भात माहिती देताना ३० ते ४० जणांनी हा हल्ला केल्याची माहिती दिली होती.

Beed News
Beed Accident: मध्य रात्रीत भररस्त्यावर वाद, दुचाकीला महागड्या गाडीने उडवलं; रस्त्यावर रक्ताचा सडा, बीडमध्ये खळबळ

मात्र आता या हल्लेखोरांचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झालेले व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये तब्बल १९ मोटारसायकली आणि या मोटारसायकलींवर असलेले जवळपास ४५ ते ५० जण दिसून येत आहेत. याच टोळक्याने आडागळे कुटुंबावर हल्ला करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल.

Beed News
Beed News: बीडमध्ये भीषण अपघात! दुचाकी समोरासमोर आदळल्या; तिघांचा जागीच मृत्यू, बाईकचा चक्काचूर

दरम्यान या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात काल २ ओळखीचे आणि इतर अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरात घुसून चाकुचा धाक दाखवत वस्तूंची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन सर्व गाड्यांचे नंबर आणि आरोपींना ट्रेस करून सर्वांवर कडक कारवाई केली जाईल कोणालाही सोडले जाणार नाही अशी माहिती फोनवरून बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com