राज्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर बनलेली असताना फायनान्स कंपन्यांची शेतकऱ्यांवर मुजोरी कायम आहे. शेतीतून उत्पन्न नाही आणि हाताला काही काम नाही अशा परिस्थितीत फायनान्स कंपन्यांचं कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय. त्यातच फायनान्स कंपन्यांचा जाच इतका वाढलाय की, हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वाघजाळी गावातील शेतकरी महिलांनी स्वतःचं राहतं घर विकायला काढलय.
फायनान्स कंपन्यांची हिंमत आता इतकी वाढलीय की आता शेतकरी महिलांनाही त्यांनी त्रास द्यायला सुरवात केलीय..हिंगोलीत नेमकी काय परिस्थिती आहे ते पाहूयात...
वाघजाळी गावात शंभर ते सव्वाशे महिलांवर दहा ते पंधरा खाजगी मायक्रो फायनान्स कंपनीचे कर्ज आहे
1 लाख रुपयांच्या कर्जावर दर 15 दिवसाला 3 हजार 500 रुपये हप्ता या महिलांना भरावा लागत असल्याचं सांगितलं जातंय
मात्र, साम टिव्हीच्या बातमीनंतर जिल्हा प्रशासनानं अॅक्शन मोडवर आलंय. नियमबाह्य वसुली करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलंय.. हिंगोलीच नव्हे तर पंढरपूरमध्येही अशीच काहीशी परिस्थिती आहे. फायनान्स कंपन्यांच्या मुजोरीमुळे एका शेतकऱ्याला घराबाहेर काढून त्याच्या राहत्या घराला कुलूप ठोकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. संपूर्ण मराठवाडा सध्या दुष्काळानं होरपळत असताना सरकारने अनेक घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, सरकारच्या घोषणा केवळ कागदावरच आहेत की काय असा प्रश्न निर्माण झालाय. कारण, वसुली न करण्याचे सरकारचे आदेश असतानाी फायनान्स कंपन्यांकडून अरेरावी कायम आहे. एव्हंढच नव्हे तर कंपन्यांच्या तगाद्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्यादेखील केल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात मायक्रो फायनान्स कंपन्यांचा विळखा शेतकऱ्यांभोवती फास आवळणारा ठरण्याआधीच सरकारनं कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.