मावळ : मावळमधील इंद्रायणी नदीवर असलेल्या कुंडमळा परिसरात मित्र मित्र फिरण्यासाठी गेलेल्या मित्रांमधील दोन जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर घटनास्थळी एमआयडीसी तळेगाव पोलीस तसेच शोधकार्यासाठी वन्यजीव रक्षक टीम दाखल झाली आहे.
चिंचवड गाव येथील श्रेया सुरेश गावडे (वय १७) आणि रोहन ज्ञानेशवर ढोंबरे (वय २२) असे वाहून गेलेल्या तरुण तरुणीचे नाव आहे. श्रेया व रोहन यांच्यासह सात ते आठ मित्र मावळातील कुंडमळा परिसरात फिरण्यासाठी गेले होते. (Maval) दरम्यान हे सर्वजण कुंडमळ्याच्या पाण्यात उतरले होते. त्यातील श्रेया व रोहन याना पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघे वाहून गेले. सोबत असलेल्या मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यावेळी सर्व मित्रांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक धावून आले.
सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर तळेगाव आंबी एमआयडीसी पोलीस आणि मावळ वन्यजीव रक्षक बचाव पथक घटनास्थळी पोहचून शोधकार्य सुरू केलं आहे. एकीकडे प्रशासनाने (Indrayani River) इंद्रायणी नदीच्या पाण्यात उतरण्यास मनाई केली असताना ही पर्यटक अश्या पध्दतीने आपला जीव धोक्यात टाकून पाण्यात उतरत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.