Maval News : ८ वर्षाच्या मुलीवर कामगाराकडून अत्याचार; मावळमधील धक्कादायक प्रकार

Maval Crime News : तळेगाव दाभाडे येथे ८ वर्षीय मुलीसोबत गैरवर्तनाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Maval News : ८ वर्षाच्या मुलीवर कामगाराकडून अत्याचार; मावळमधील धक्कादायक प्रकार
Maval Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • तळेगाव दाभाडे येथे ८ वर्षीय मुलीसोबत गैरवर्तनाचा प्रकार घडला

  • मुलीने धाडसाने सुटका करून पालकांना माहिती दिली

  • पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली

  • घटनेनंतर मुलींच्या सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये चिंता आणि संताप वाढला

मावळच्या तळेगाव दाभाडे येथील परिसरात एका ८ वर्षीय मुलीसोबत भयंकर प्रकार घडला आहे. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेनंतर लहान मुलांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील सिल्वर विंग अपार्टमेंटमध्ये आठ वर्षांची मुलगी इमारतीखाली खेळत होती. याचवेळेस त्याच परिसरात गॅरेजवर काम काम करणाऱ्या एका कामगाराने तिला पाठीमागून पकडून गैरवर्तन केले.

Maval News : ८ वर्षाच्या मुलीवर कामगाराकडून अत्याचार; मावळमधील धक्कादायक प्रकार
Dombivli : डोंबिवलीतील 'त्या' विद्यार्थिनीच्या खात्यात २ कोटी ६० हजार; उल्हासनगर ते उत्तराखंड कनेक्शन; नेमकं प्रकरण काय?

त्याच्या अश्लील स्पर्शाने मुलगी घाबरली. तिने नराधमाच्या तावडीतून स्वतःची कशीबशी सुटका केली. घाबरलेल्या अवस्थेत मुलीने घरी जाऊन पालकांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

Maval News : ८ वर्षाच्या मुलीवर कामगाराकडून अत्याचार; मावळमधील धक्कादायक प्रकार
Nagpur : ३२ वर्षांच्या मामीला पाहून भाच्याची नियत फिरली, बेडवर ढकलले अन् विनयभंग केला, नागपूरमध्ये नात्याला काळीमा

तक्रारीनंतर तळेगाव दाभाडे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयिताला ताब्यात घेतले आणि अटक केली. आरोपीविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com