Matheran: विकेंडला माथेरानला जाताय? टॉय ट्रेन बंद; शटल सेवेचं वेळापत्रक वाचा

Matheran Shuttle Timetable: माथेरानला जाण्याचा प्लान करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. पावसाळ्यात माथेरानला जाण्याची टॉय ट्रेन बंद असणार आहे. या कालावधीत शटल सेवा सुरु असणार आहे.
Matheran
MatheranSaam Tv
Published On

सध्या पासाळा सुरु झाला आहे. पावसाळ्यात अनेकजण फिरायला जाण्याचा प्लान करतात. अनेक पर्यटक माथेरानला भेट देतात. जर तुम्हीही या वीकेंडला माथेरानला जाण्याचा प्लान करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. आता माथेरानची राणी म्हणजे टॉय ट्रेन बंद करण्यात आली आहे. तुम्ही शटलने जाऊ शकतात. त्याचेच वेळाप्रत्रक समोर आले आहे.

Matheran
Matheran: 'माथेरानची राणी' ४ महिने विश्रांती घेणार, नेरळवरुन आता असा करा प्रवास

मध्य रेल्वे माथेरान ते अमन लॉज दरम्यान आठवड्याच्या दिवशी ६ जोड्या आणि शनिवार/रविवारी ८ जोड्या सेवा चालवणार आहे. नेरळ-अमन लॉज दरम्यान सेवा स्थगित करण्यात आली आहे. मध्य रेल्वेने पावसाळ्यात दिनांक ०१.०६.२०२५ ते दिनांक १५.१०.२०२५ पर्यंत नेरळ- माथेरान नॅरो गेज मार्गाच्या नेरळ- अमन लॉज विभागादरम्यान नियमित प्रवासी सेवा स्थगित केल्या आहेत.

या कालावधीत माथेरान- अमन लॉज दरम्यान शटल सेवा

माथेरान-अमन लॉज शटल सेवा

(अ) माथेरान-अमन लॉज शटल सेवा (दैनंदिन)

१. 52154 माथेरान येथून प्रस्थान ०८.२० वाजता होईल आणि अमन लॉज येथे आगमन ०८.३८ होईल.

२. 52156 माथेरान येथून प्रस्थान ०९.१० वाजता होईल आणि अमन लॉज येथे आगमन ०९.२८ वाजता होईल.

३. 52158 माथेरान येथून प्रस्थान ११.३५ वाजता होईल आणि अमन लॉज येथे आगमन ११.५३ वाजता होईल.

४. 52160 माथेरान येथून प्रस्थान १४.०० वाजता होईल आणि अमन लॉज येथे आगमन १४.१८ वाजता होईल.

५. 52162 माथेरान येथून प्रस्थान १५.१५ वाजता होईल आणि अमन लॉज येथे आगमन १५.३३ वाजता होईल.

६. 52164 माथेरान येथून प्रस्थान १७.२० वाजता होईल आणि अमन लॉज येथे आगमन १७.३८ वाजता होईल.

(शनिवार/रविवार)

७. विशेष-२: माथेरान येथून प्रस्थान १०.०५ वाजता होईल आणि अमन लॉज येथे आगमन १०.२३ वाजता होईल.

८. विशेष-४: माथेरान येथून प्रस्थान १३.१० वाजता होईल आणि अमन लॉज येथे आगमन १३.२८ वाजता होईल.

(ब) अमन लॉज-माथेरान शटल सेवा (दैनंदिन)

१. 52153 अमन लॉज येथून प्रस्थान ०८.४५ वाजता होईल आणि माथेरान येथे आगमन ०९.०३ वाजता होईल.

२. 52155 अमन लॉज येथून प्रस्थान ०९.३५ वाजता होईल आणि माथेरान येथे आगमन ०९.५३ वाजता होईल.

३. 52157 अमन लॉज येथून प्रस्थान १२.०० वाजता होईल आणि माथेरान येथे आगमन १२.१८ वाजता होईल.

४. 52159 अमन लॉज येथून प्रस्थान १४.२५ वाजता होईल आणि माथेरान येथे आगमन १४.४३ वाजता होईल.

५. 52161 अमन लॉज येथून प्रस्थान १५.४० वाजता होईल आणि माथेरान येथे आगमन १५.५८ वाजता होईल.

६. 52163 अमन लॉज येथून प्रस्थान १७.४५ वाजता होईल आणि माथेरान येथे आगमन १८.०३ वाजता होईल.

Matheran
Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी, माथेरानची राणी उद्यापासून सुसाट धावणार!

(शनिवार/रविवार)

७. विशेष-१: अमन लॉज येथून प्रस्थान १०.३० वाजता होईल आणि माथेरान येथे आगमन १०.४८ वाजता होईल.

८. विशेष-३: अमन लॉज येथून प्रस्थान १३.३५ वाजता होईल माथेरान येथे आगमन १३.५३ वाजता होईल.

सर्व शटल सेवा ३ द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी कोच आणि २ द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅनसह चालतील.

प्रवाशांनी कृपया बदल लक्षात घ्यावेत आणि शटल सेवा सुविधेचा लाभ घ्यावा अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Matheran
Matheran: 'माथेरान' हे नाव कुठून आलं? इतिहास वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com