Matheran: 'माथेरानची राणी' ४ महिने विश्रांती घेणार, नेरळवरुन आता असा करा प्रवास

Matheran Toy Train Close For 4 Months: माथेरानची राणी म्हणून ओळखली जाणारी टॉय ट्रेन आता बंद राहणार आहे. पावसाळ्यात सुरक्षेच्या कारणात्सव ही ट्रेन ४ महिने बंद राहणार आहे.
Matheran
MatheranSaam Tv
Published On

नेरळ-माथेरान या नॅरोगेज मार्गावर चालणारी मिनिट्रेन पावसाळी चार महिने बंद रहाणार आहे. 1 जून ते 15 ऑक्टोबर पर्यंत ही सेवा बंद राहणार असून अमन लॉज ते माथेरान शटल सेवा सुरळीत आपल्या नियोजित वेळेनुसार धावणार आहे. दरम्यान प्रत्येक शनिवारी रिकाम्या बोगी घेऊन नेरळ हुन मिनिट्रेन सुटेल व माथेरानमध्ये आल्यानंतर शटल सेवेमध्ये रूपांतर केले जाणार आहे. तसेच मालवाहू मिनिट्रेन दररोज चालविली जाणार आहे.

Matheran
Matheran Toy Train : माथेरान ट्रेन आता पावसाळ्यातही धावणार; मध्य रेल्वेचा प्लान आहे तरी काय? वाचा

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अमन लॉज ते वॉटर पाईप स्थानकादरम्यान दरड कोसळण्याचे प्रकार घडले असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मिनिट्रेन 1 जून पासून विश्रांती घेणार आहे. तर 15 ऑक्टोबरला रेल्वे रुळाचा आढावा घेऊन सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर प्रवाश्यांच्या सेवेसाठी धावणार आहे. अशी माहिती परिपत्रकाद्वारे मध्य रेल्वेने दिली आहे.

या 21 किलोमीटर अंतरामध्ये दरड प्रवण क्षेत्र असल्याने तसेच भूस्खलनाचे प्रकार झाले असल्याने पर्यटक, प्रवाश्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील चार महिने विश्रांती घेणार आहे अशी माहिती परिपत्रकाद्वारे मध्य रेल्वेच्या परिचालन विभागाने दिली आहे. त्या पत्रकात पुढे असेही नमूद केले आहे की, 7 जून पासून प्रत्येक शनिवारी रिकामी बोगी घेऊन सकाळी 8:50 वाजता मिनिट्रेन नेरळ हुन सुटेल व माथेरानमध्ये आल्यानंतर शटल सेवेत रूपांतरित होऊन राहिलेल्या बोगी घेऊन त्याच दिवशी दुपारी 2:45 मिनिटांनी माथेरानहून सुटेल.

Matheran
Matheran: पृथ्वीवरील स्वर्ग अनुभवायचाय? माथेरानला भेट द्या; सौंदर्य पाहून डोळे दिपतील

तसेच दररोज सकाळी (शनिवार व रविवार वगळता) 8:20 वाजता मालवाहू गाडी नेरळहुन सुटेल व सूर्यास्त होण्याच्या आत नेरळस्थानकात येईल.नेरळ-माथेरान ही मिनिट्रेन बंद झाली असली तरी शटल सेवा ही प्रवाशी व पर्यटक याना नियमित दिली जाणार आहे. मिनिट्रेन हे माथेरान या पर्यटनस्थळाचे मुख्य आकर्षण असल्याने पर्यटक या मिनिट्रेनमध्ये बसून निसर्गाच्या सानिध्यात मजा करायला येतात. पर्यटकांचा हिरमोड होऊ नये यासाठी अमन लॉज-माथेरान शटल सेवा दररोज सुरू राहणार आहे.

Matheran
Matheran News: माथेरानमध्ये पर्यटकांच्या दोन गटात हाणामारी, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com