Siddhi Hande
एका दिवसाची ट्रीप प्लान करत असाल तर माथेरान हे फिरण्यासाठी बेस्ट ठिकाण आहे.
मुंबईपासून जवळच असलेल्या माथेरानला तुम्ही जाऊ शकतात. यासाठी तुम्हाला नेरळ स्टेशनला उतरावे लागेल.
माथेरानमधील टॉय ट्रेन खूप प्रसिद्ध आहे. टॉय ट्रेनने तुम्ही संपूर्ण माथेरान फिरु शकतात.
चार्लोट तलाव हा माथेरानला पाठी पुरवठा करणारा मोठा स्त्रोत आहे. चार्लोट तलावातील दृश्य खूपच मस्त असते.
पानोरामा पॉइंटला जाण्यासाठी थोडं ट्रेकिंग करावा लागतं. येथून तुम्हाला माथेरानचे ३६० डिग्री दृश्य एकाच ठिकाणावरुन दिसणार आहे.
माथेरानमधील इको पॉइंट हा खूप फेमस आहे. इको पॉइंटवर जाऊन मोठ्याने ओरडल्यावर तुमचाच आवाज तुम्हाला परत येतो.
तुम्ही माथेरान फिरण्यासाठी घोडस्वारीदेखील करु शकतात. हा अनुभव खूपच मस्त असतो.
माथेरानमध्ये गेल्यावर तेथील स्थानिक दुकांनावर शॉपिंग नक्की करा. तिथे स्वतः च्या हाताने बनवलेल्या अनेक वस्तू विकण्यासाठी असतात.