Nashik : सप्तश्रृंगी गड घाटात भाविकांच्या गाडीवर कोसळली दरड; मोठी दुर्घटना टळली

Nashik News : मागील काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. जोरदार होत असलेल्या या पावसामुळे डोंगर भागातील दगड कोसळत आहेत. यातूनच वणीच्या गडाच्या घाट रस्त्यात दरड कोसळल्याची घटना घडली
Nashik News
Nashik NewsSaam tv
Published On

अजय सोनवणे 
नाशिक
: नाशिक जिल्ह्यात मागील दहा- बारा दिवसांपासून सतत पाऊस होत आहे. यामुळे डोंगर दऱ्यांचा भाग कोसळत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. याच दरम्यान नाशिकच्या सप्तश्रुंगी गडावर जाणाऱ्या भाविक घाट रस्त्यातून जात असताना त्यांच्या गाडीवर अचानक दरडीचा काही भाग कोसळला आहे. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून कारमधील भाविक सुखरूप आहेत. 

सुट्यांचा कालावधी असल्याने अनेकजण फिरणे आणि देवदर्शनासाठी जात आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने जात आहेत. दरम्यान मागील काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. जोरदार होत असलेल्या या पावसामुळे डोंगर भागातील दगड कोसळत आहेत. यातूनच वणीच्या गडाच्या घाट रस्त्यात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. 

Nashik News
Murbad : पीएफ आणि पेन्शनसाठी १० वर्षापासून प्रतीक्षा; मुरबाडमधील निवृत्त एसटी कर्मचाऱ्याची इच्छामरणाची मागणी

कार दगड कोसळल्याने मोठे नुकसान 

सप्तशृंगी देवीच्या गड चढण्यासाठी मोठा घाट रस्ता आहे. या घाटात काल दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाल्यामुळे किरकोळ स्वरूपात दरड कोसळल्याची घटना घडली. या दरडीतून दगडगोटे पुण्याहून आलेल्या भाविकांच्या कारवर पडले. त्यामुळे गाडीच्या काचा, साइड मिरर तसेच अन्य भागांचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने गाडीत असलेल्या भाविकांना कोणतीही दुखापत झाली नाही. 

Nashik News
Unseasonal Rain : राज्यात अवकाळीचा तडाखा; अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान, कृषी विभागाकडून नुकसानीची आकडेवारी जाहीर

प्रशासनाने वाहतुकीसाठी रस्ता केला मोकळा 
दरम्यान घटनेची माहिती मिळताच नांदुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी तसेच पोलीस मित्र आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने दगड हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. दरड कोसळण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी घाटात मोठ्या जाळ्यांची बसवणूक करण्यात आली आहे. मात्र, या जाळ्यांचा आकार मोठा असूनही अशा घटना घडत असल्याने संबंधित विभागाने तात्काळ ठोस उपाययोजना करावी; अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com