Nandurbar Fire News : सिंदीदिगरला भीषण आगीत उभा संसार जळून खाक

कौलारू घरातील चुलिने पेट घेतला यात संपूर्ण घर जळून खाक झाले.
Nandurbar, Nandurbar Fire News
Nandurbar, Nandurbar Fire Newssaam tv
Published On: 

- सागर निकवाडे

Nandurbar News : सातपुड्यातील धडगाव तालुक्यातील सिंदीदिगर येथे कौलारू घराला भीषण आग लागली. यामुळे घरातील संपूर्ण संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाले आहे. त्यामुळे पावरा कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे. (Maharashtra News)

Nandurbar, Nandurbar Fire News
Chhatrapati Sambhaji Nagar Airport News : बायकोशी भांडण झाल्याने त्याने पाेलिसांना चक्क दिली विमानतळ उडविण्याची माहिती; बीडीडीएसच्या पथकाची धावपळ

अतिदुर्गम भागातील सिंदींदिगर येथील बकत्या सुरला पावरा यांचा घरातील महिला सदस्य घरात चुलीवर स्वयंपाकासाठी चूल पेटवून पाणी घेण्यासाठी बाहेर आले. कौलारू घरातील चुलिने पेट घेतला यात संपूर्ण घर जळून खाक झाले.

Nandurbar, Nandurbar Fire News
Yavatmal Cotton Price: कापसाचा दर घसरला; जाणून घ्या नवीन दर

यात घरातील धान्य, भांडे सह गुरासाठी ठेवण्यात आलेला चारा जळून खाक झाला आहे. यावेळी ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली परंतु उन्हाची तीव्रता तसेच जवळ आग वीझविण्यासाठी पाणी उपलब्ध झाले नसल्याने आग आटोक्यात आणता आली नाही.

यामुळे बकत्या सूरला पावरा यांचे कुटुंब उघड्यावर पडले असून शासना कडून यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com