उरणमध्ये गोदामाला भीषण आग; धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळांनी परिसर हादरला, रहिवाशांना श्वसनाचा त्रास

Massive Fire At Platinum Logistics Warehouse In Uran Raigad: रायगडच्या उरण तालुक्यातील वेश्वी येथील प्लॅटिनम लॉजिस्टिक गोदामाला भीषण आग लागली. गोदामातील केमिकल साठ्यामुळे मोठे स्फोट झाल्याची माहिती असून धुरामुळे रहिवाशांना श्वसनाचा त्रास होत आहे. अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
MASSIVE FIRE AT PLATINUM LOGISTICS WAREHOUSE IN URAN
MASSIVE FIRE AT PLATINUM LOGISTICS WAREHOUSE IN URANsaam tv
Published On: 

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या प्लॅटिनम लॉजिस्टकच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या गोदामात मालासह केमिकलचा साठा असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगीदरम्यान गोदामात मोठे स्फोट झाले. या स्फोटांच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

गोदामातून आगीच्या मोठमोठ्या ज्वाळा आणि धुराचे लोट हवेत पसरताना दिसत आहे. धुराचे प्रमाण वाढल्याने परिसरातील रहिवाशांना श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांची धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

MASSIVE FIRE AT PLATINUM LOGISTICS WAREHOUSE IN URAN
Water Crisis: चिंता वाढली! राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट, फक्त ६४.१७ टक्के पाणीसाठा शिल्लक

दरम्यान, उरण तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत हद्दीत शासनाच्या नियमांना बगल देत कंटेनर यार्ड आणि गोदामे उभारण्यात आल्याचा आरोप होत आहे. या गोदामांचे वेळोवेळी फायर ऑडिट होत नसल्याने आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा मुद्दाही उपस्थित केला जात आहे. त्यामुळे अशा गोदामांची अग्निसुरक्षा तपासणी आणि प्रशासनाच्या देखरेखीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.