- अक्षय बडवे / मंगेश कचरे
Jejuri News : अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथे विश्वस्त पदाच्या निवडीवरून वाद निर्माण झाला हाेता. यामुळे जेजुरी ग्रामस्थांनी बेमुदत धरणे आंदोलनास प्रारंभ केला. आगामी काळात जेजुरी गाव बंद ठेवण्यापर्यंतचा निर्धार ग्रामस्थांनी बाेलून दाखविला हाेता. दरम्यान आज (बुधवार) आंदोलनाच्या तेराव्या दिवशी जेजुरीकरांना एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. (Maharashtra News)
जेजुरी खंडोबा मंदिराच्या सात जणांच्या विश्वस्त मंडळात (Jejuri Temple Trust) जेजुरीबाहेरील तब्बल पाच जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णया विराेधात तसेच निवडीसाठी सहधर्मदाय आयुक्तांनी कोणते निकष लावले, असा प्रश्न उपस्थि केला गेला. आज सहधर्मदाय आयुक्त कार्यालयात सुनावणी झाली.
या सुनावणीत मार्तंड देवस्थानाच्या विश्वस्त (martand devasthan jejuri) मंडळाची सदस्य संख्या 7 वरून 11 करण्याचे निश्चित झाले. यामध्ये जेजुरी ग्रामस्थांची संख्या सहा आणि बाहेरचे पाच असे एकूण 11 विश्वस्तांची नियुक्ती करण्याचे निश्चित झाले. घटना दुरुस्ती करून पुन्हा एकदा सोमवारी अंतिम सुनावणी होणार असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले.
दरम्यान या सुनावणीनंतर जेजुरी ग्रामस्थांनी येळकाेट येळकाेट जय मल्हार अशा घाेषणा देत जल्लाेष केला.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.