Bhalchandra Nemade: वाल्मिकीचा राम खरा कसा म्हणायचा? ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचा प्रश्न

Bhalchandra Nemade News: ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी रामायण कथेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. भालचंद्र नेमाडे यांनी रामायण कथेवर प्रश्न केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
Bhalchandra Nemade
Bhalchandra NemadeSaam tv
Published On

संजय महाजन, जळगाव

bhalchadra nemade statement :

ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी रामायण कथेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. भालचंद्र नेमाडे यांनी रामायण कथेवर प्रश्न केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आम्ही कोणता राम खरा मानायचा? वाल्मिकीचाच राम कशामुळे खरा? असा सवाल भालचंद्र नेमाडे यांनी केला आहे. जळगावमधील कार्यक्रमात ते बोलत होते. (Latest Marathi News)

जळगावमध्ये आयोजित साहित्यकला पुरस्कार वितरण सोहळ्यात भाषणादरम्यान भालचंद्र नेमाडे यांचे रामयण कथेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. राम शाकाहारी होता की मांसाहारी होता हे वाचून लक्षात येते, त्यामुळे त्याची चर्चा करण्याची आवश्यकता नाही.रामायण हे दोनशे प्रकारचे असून प्रत्येक रामायणामध्ये राम हा वेगळा आहे. आता जे रामायण पाहायला मिळते, ते वाल्मिकींचे आहेत. मात्र वाल्मिकी शृंगांचे दरबारी कवी असल्याने संघांना आवडेल तसं त्यांनी रामायण लिहिलं, असे नेमाडे म्हणाले.

Bhalchandra Nemade
Badgujar : सुधाकर बडगुजरांच्या अडचणीत वाढ; Bail की jail २० तारखेला कळेल

'वाल्मिकींच्या रामायणामधील राम खरा कसा मानायचा? आसाममधील करवी लोकांच्या रामायणमधील सीता ही रामाला शिव्या देत होती. त्यामुळे ते रामायण मराठीसह सर्व भाषांमध्ये यायला पाहिजे, असे देखील भालचंद्र नेमाडे यांनी म्हटले आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bhalchandra Nemade
ED Arrest Suraj Chavan: मोठी बातमी! आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक

'रामायणाच्या कथेचा हजारो वर्षांचा इतिहास असून त्यात विविधता आहे. वाल्मिकीच्या आधीही रामायण होतं. त्यानंतर ते बदलत बदलत वाल्मिकीपर्यंत आलं. वाल्मिकी एका राजाच्या दरबारातील कवी होता. देशातील प्रत्येक कथेमध्ये वेगवेगळा राम आहे. काही कथेत सीता रावणाची मुलगी आहे, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com