Marathi News Live Updates : अजिंक्य नाईक यांना माझा पाठिंबा: जितेंद्र आव्हाड

Maharashtra Political Breaking News 16th July 2024 : मुंबई पुण्यासह, कोकणातील पावसाचे अपडेट्स तसेच महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

Jitendra Awhad : अजिंक्य नाईक यांना माझा पाठिंबा: जितेंद्र आव्हाड

अजिंक्य नाईक यांना माझा पाठिंबा आहे आणि माझा पाठिंबा आहे म्हणजे आता पुढे काय सांगायला नको. ही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढाई नाही. आशिष शेलार यांना अध्यक्ष शरद पवार यांनीच केले. अजिंक्य नाईक 24 तास सगळ्यांसाठी उबलब्ध असतील. अजिंक्य नाईक हे स्वतः काम करतील त्यांच्या कामात कधीच कोणी मध्यस्थी करणार नाही शरद पवार देखील, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

MP Nilesh Lanke : उच्च न्यायालयात नक्की न्याय मिळेल, कबड्डी असोसिएशन मतदार यादीतून नाव अपात्र याचिकेवर खासदार लंकेंची प्रतिक्रिया

खासदार निलेश लंके यांचं राज्य कबड्डी असोसिएशनच्या मतदार यादीतून नाव अपात्र ठरवल्यानंतर लंके यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात येत्या 18 जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास लंके यांनी व्यक्त केला आहे.

CM Eknath Shinde : अखिल भारतीय होलार समाजाने अडवला मुख्यमंत्र्यांचा ताफा

अखिल भारतीय होलार समाजाने मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवत मुख्यमंत्र्यांच्या कारसमोर घोषणाबाजी केली. आर्थिक विकास महामंडळ आणि अभ्यास आयोगावरून होलार समाज आक्रमक झाला आहे. आषाढी यात्रेला येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना रोखण्याचा देण्यात आला होता.

Beed Rain News : बीडच्या माजलगावमध्ये मुसधार पाऊस, मुख्य रस्ते गेले पाण्याखाली

बीडच्या माजलगावमध्ये जोरदार पाऊसाने हजेरी लावली आहे. यामुळं माजलगाव शहरातील मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहेत. शहरातील बसस्टँड परिसर, शिवाजी महाराज चौक, मोंढा परिसर यासह अन्य परिसरातील रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. यामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे.

Raigad Breaking News : पावसाळी पर्यटनाचा आणखी एक बळी, माणगाव तालुक्यातील कुंभे धरणात तरुणी बुडाली

पावसाळी पर्यटनाचा रायगडमध्ये आणखी एक बळी गेल असून माणगाव तालुक्यातील कुंभे येथील धरणात तरुणी बुडाली आहे. बुडालेला तरुणीचा मृतदेह शोधण्याकामी बचाव पथकाला यश आलं आहे. मुंबईतील माटुंगा येथील अन्वी कामदार असं तरुणीचं नाव आहे.पाच ते सहा जण पावसाळी पर्यटनासाठी रायगडमध्ये आले असताना ही दुर्घटना घडली आहे.

Cow Milk : गाईच्या दुधाला 40 रुपये हमीभाव मिळवा, इंदापूरच्या दूध परिषदेत मागणी 

पुण्यातील इंदापूरमध्ये गाईच्या दुधाला 40 रुपये हमीभाव मिळवा यासाठी शिवधर्म फाउंडेशन आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून दूध परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक डाॅ.अजित नवले यांनी या परिषदेतून दूध उत्पादकांच्या समस्या मांडत संकरीत गाईच्या दूधाला 40 रुपये दर देण्याची मागणी केली.

Kolhapur News :  हर्षवर्धन पाटलांविरोधात इंडिया आघाडीची इंचलकरंजीत निदर्शने

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंचलकरंजीबाबत केलेल्या विधानाविरोधात इचलकरंजीकर आक्रमक झाले आहेत. हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत इंडिया आघाडीने शहरात निदर्शने केली. इचलकरंजी हे पाक व्याप्त काश्मीर आहे असं विधान करणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांनी केलं होतं.

Mumbai Pune Expressway : मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अमृतांजन ब्रिज बोरघाटात मोठी वाहतूक कोंडी

मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेस वे अमृतांजन ब्रिज बोरघाटात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. विकेंड नसतानाही वाहतूक कोंडी झाली असून मुंबईवरून पुण्याला जाणारे वाहतूक संथ गतीने सुरू आहे. दरम्यान या वाहन कोंडीमुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

NEET Paper Leak : NEET पेपरलीक प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई, प्रश्नपत्रिका चोरणाऱ्या दोघांना अटक

NEET पेपरलीक प्रकरणात सीबीआयने आणखी दोघांना अटक केली आहे. पंकज कुमार उर्फ ​​आदित्यला बिहारची राजधानी पाटणा येथून अटक केली आणि राजू सिंगला हजारीबाग, झारखंड येथून अटक केली आहे. पंकजने हजारीबाग येथील बॉक्समधून पेपर चोरून ते नंतर वाटप केले होते, त्याचवेळी राजू सिंगने पेपर वाटपासाठी मदत केली होती.

Nashik -Mumbai Highway : जोपर्यंत महामार्ग खड्डेमुक्त नाही, तोपर्यंत टोल बंद करा; नाशिक-मुंबई महामार्गावरील टोल वसुलीवरून ठाकरे गट आक्रमक

नाशिक मुंबई महामार्गावरील टोल वसुली वरून ठाकरे गट आक्रमक झाला आहे. जोपर्यंत महामार्ग खड्डेमुक्त होत नाही, तोपर्यंत टोल बंद करण्याची ठाकरे गटाने मागणी केली आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक दिली असून २ दिवसांत रस्ते दुरुस्ती न झाल्यास शिवसेना स्टाईलने टोल नाके बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

IAS Pooja Khedkar :  वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरवर मोठी कारवाई

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत. लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाची कारवाई. 23 जुलै पूर्वी मसूरी येथील अकॅडमी मध्ये पुन्हा हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

CM Eknath Shinde : पनवेलजवळ अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत, मुख्यमंत्र्याची घोषणा

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या बसचा पनवेलजवळ सोमवारी रात्री भीषण अपघात झाला होता. या अपघातात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. जखमी रुग्णांवर राज्य सरकार मार्फत मोफत उपचार करण्यात येत आहेत. प्रशासनाला रुग्णांची सर्व प्रकारची काळजी घेण्यास सांगण्यात आली आहे. तसंच अपघाताची सखोल चौकशी करण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

Prakash Ambedkar : 18 जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा सुरू करणार, प्रकाश आंबेडकर यांची माहिती

१८ जुलैपासून सुरुवात आरक्षण बचाव यात्रा सुरू केली जाणार आहे. कोल्हापूर ते संभाजीनगर असा यात्रेचा प्रवास असेल, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. अनेक OBC संघटनानी OBC चा लढा हातामध्ये घेण्याची विनंती केली होती, असं त्यांनी म्हटलं आहे.

Worli Hit And Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरण : आरोपी मीहिरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

वरळी हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी मिहिर शहाची रवानगी न्यायालयीन कोठडीत होणार आहे. मिहिर शहाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

Sharad Pawar News : शरद पवारांनी घेतली जुने सहकारी एन टी निकम यांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे जुने सहकारी एन टी निकम यांची भेट घेतली. निकम पुण्याचे माजी उपमहापौर होते. निकम सध्या पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्या ठिकाणी जाऊन शरद पवार यांनी निकम यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या भेटीनंतर निकम यांचे पुत्र माजी नगरसेवक निलेश निकम यांच्याकडून सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करण्यात आली.

worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरण : आरोपी मिहिर शहाला केलं शिवडी कोर्टात हजर

वरळी पोलीसांनी मिहिर शहाला शिवडी कोर्टात हजर केलं. सहा दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर मिहिर शहाला कोर्टात हजर केलं.

पोलीस मिहिर शहाची कोठडी वाढवून मागण्याची शक्यता आहे. आत्तपर्यंतच्या तपासाचा लेखाजोखा कोर्टात सादर करणार आहे.

मिहिर शहाच्या BMW गाडीच्या धडकेत कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला होता.

Devendra Fadnavis News  : पंढरपूरला जाण्यासाठी मुंबईतून नमो एक्स्प्रेस, उपमुख्यमंत्री फडणवीस दाखवणार हिरवा झेंडा

आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून नमो एक्सप्रेस सोडण्यात येणार आहे. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी नियोजन केलेल्या या नमो एक्सप्रेसला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या एक्स्प्रेसच्या माध्यमातून वारकरी व भाविकांना मुंबई ते पंढरपूर आणि पंढरपूर ते मुंबई असा मोफत प्रवास करता येणार आहे.

Farmer News : राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार?

राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफी करण्याची मागणी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. मंत्री सत्तार यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री शिंदे काय निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी. राज्याने आणि केंद्राने तातडीने विचार करून 30 दिवसात कर्जमाफी द्यावी,

Mumbai Rain News: मुंबई पश्चिम उपनगरात पावसाला सुरूवात

मुंबईतील पश्चिम उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झालीये. हवामान खात्याने मुंबई ठाणे आणि रायगड परिसराला ऑरेंज अलर्ट जारी केला होता. मात्र आज सकाळी सूर्यदर्शन झाल्यामुळे पाऊस पडेल की नाही असे वाटत होते. याचदरम्यान, आता मागील पंधरा मिनिटांपासून मुंबई पश्चिम उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, कांदिवली, बोरिवली या परिसरात जोरदार पाऊस पडत आहे.

Sharad Pawar Press Conference: उद्या पुण्यात शरद पवारांची पत्रकार परिषद

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची उद्या पुण्यात पत्रकार परिषद होणार आहे. पुण्यातील मोदी बागेत उद्या दुपारी 12 वाजता शरद पवार माध्यमांशी संवाद साधणार आहेत. छगन भुजबळांची भेट, मराठा आरक्षण तसेच आगामी विधानसभा निवडणुांबाबत ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

IAS Pooja Khedkar: पूजा खेडकर प्रकरण: पुणे पोलीस राज्य सरकारला अहवाल देणार

पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अँटी चेंबर मिळवण्यासाठी केलेला खटाटोप, त्यावरून वडिलांनी टाकलेला दबाव, आई मनोरमा यांचे पिस्तुलाने धमकावणे, ग्रामीण पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा, ऑडी कारवर लावलेला अंबर दिवा तसेच पूजा खेडकर यांचे दिव्यांग प्रमाणपत्र आणि इतर बाबींचा प्राथमिक अहवाल येत्या काही दिवसात सादर केला जाणार आहे

Ashadhi Ekadashi 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आषाढी एकादशीचा विठ्ठल रुक्मिणी पोषाख

आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाला परिधान केला जाणारा खास पोषाख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबीयांकडून आज अर्पण केला. विठुरायासाठी अंगी,शेला आणि रूक्मिणी मातेसाठी हिरव्या रंगाची पैठणी असे भरजरी महावस्त्र विठ्ठल आणि रुक्मिणीला अर्पण केले आहे. देवाचा खास पोषाख खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांनी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडे सुपूर्द केला. मागील तीन वर्षांपासून आषाढीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून विठुरायाला खास पोषाख भेट दिला जातो. हाच पोषाख यंदाच्या आषाढीला विठ्ठल रुक्मिणीचा परिधान केला‌ जाणार आहे.

IAS Pooja Khedkar News: राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त प्रविण पुरी यांचे पुण्याच्या जिल्हाधिकार्यांना पत्र

- ⁠पुजा खेडकर यांची चौकशी करुन गुन्हा दाखल करा. राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त प्रविण पुरी यांचे पुण्याच्या जिल्हाधिकार्यांना पत्र

- ⁠खोटे दिव्यांग प्रमाणपत्रावर शासकीय नोकरी मिळवली असल्यास, असे प्रमाणपत्र मिळवणार्यावर आणि प्रमाणपत्र देणार्या डॅाक्टरांची चौकशी करुन गुन्हा दाखल करावा. असे पत्र .

⁠दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे काही दिव्यांगांनी पुजा खेडकर यांच्या विरोधात केली आहे तक्रार. या तक्रारीच्या आधारे अपंग कल्याण आयुक्तांचे जिल्हाधिकार्यांना पत्र

- ⁠अपंग प्रमाणपत्र देणार्यांचे रॅकेट असल्यास त्यांचीही चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी.

Congress Cross Voting: 'गद्दारांवर कारवाई होणार', विजय वडेट्टीवार

विधान परिषद निवडणुकीत ज्यांनी क्रॉस व्होटिंग केले, त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हायकमांडकडे पाठवला आहे. 19 तारखेला मुंबईत महत्वाची बैठक होणार आहे. त्यावेळी प्रभारी रमेश चेन्नीथाला, राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणुगोपाल उपस्थित राहणार आहेत. त्यात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. ज्यांनी गद्दारी केली, त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव एकमताने दिलेला आहे. पक्षाशी गद्दारी करणारी कीड संपवली जाईल, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.

Supreme Court New Judge: सुप्रीम कोर्टाला मिळाले २ नवे न्यायाधीश;

सुप्रीम कोर्टाला दोन नवे न्यायाधीश मिळाले असून दोन्ही न्यायाधीशांच्या नियुक्तीला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. सरन्यायाधीश DY चंद्रचूड गुरुवारी दोन्ही न्यायाधिशांना शपथ देतील. न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंह आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनवण्यात आले आहे. नियुक्तीनंतर न्यायमूर्ती सिंग हे मणिपूरचे पहिले व्यक्ती असतील जे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश बनतील.

Yavatmal Rain News: महागावमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस; राष्ट्रीय महामार्गावर पाणी

यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील दहिसावळी आणि पोहंडूळ येथे ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला असून गावच्या सखल भागात पुराचे पाणी साचले आहे. शेजारी असलेल्या नाल्याला आलेल्या पुरामुळे नागपूर -तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग वर पुलावरून पाणी वाहत असून त्यामुळे काही वेळेसाठी वाहतूक व्यवस्था बंद झाली.तसेच पुराच्या पाण्यामुळे शेतीतील पिकांचे व जमीनीचे नुकसान झाले आहे.

Chandrapur News: पोलीस शिपायाने संपवले आयुष्य; चंद्रपूरमधील घटना

पोलीस शिपायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पोलीस वसाहतीत घडली. मृत पोलिसाचे नाव अजय मोहूर्ले असे असून तो बल्लारपूर पोलिस स्थानकात शिपाई या पदावर कार्यरत होता. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले असून शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आले. अजयने ही आत्महत्या दोन दिवसांपूर्वी केली असावी, असा प्राथमिक अंदाज बल्लारपूर पोलिसांनी व्यक्त केला. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. परंतु मानसिक तणावातून ती करण्यात आली असावी, अशी शंका उपस्थित केली जात आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे. दोन दिवसांपूर्वी याच जिल्ह्यात एका पोलीस शिपायाने तणाव सहन न झाल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ही दुसरी घटना घडल्याने पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

NCP Party And Symbol Hearing: 'दोन आठवड्यात उत्तर द्या', सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला आदेश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अन् चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये अजित पवार यांना दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी ६ ऑगस्टला होणार आहे.

MNS Protest Pune: पुण्यात मनसेचे 'ढोल बजाओ' आंदोलन

रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या म्हाडा कार्यालयासमोर मनसेने ढोल बजाओ आंदोलन केले आहे. गोरगरीबांच्या घराचे स्वप्न भंग करून म्हाडाचे अधिकारी बिल्डरला देत असलेल्या बेकायदेशीर परवानगी विरोधात अधिकारी बनकर व अशोक पाटील यांच्या निषेधार्थ महाराष्ट्र निर्माण सेना विधी व जनहित विभागाच्या वतीने आंदोलन हे आंदोलन करण्यात आले आहे.

Ashadhi Wari 2024: विठ्ठल मंदिराचं पुरातन रूप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

आषाढी यात्रेच्या निमित्ताने लाखो भाविकांना विठ्ठलाचे मूळ रूप येणार आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मंदिर पाहण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. मंदिरापासून जवळपास पाच किलोमीटर अंतरावर विठ्ठल पदस्पर्श दर्शनाची रांग गेली आहे. सध्या जवळपास 17 ते 18 तासांचा दर्शनासाठी अवधी लागत आहे. तरी ही न थकता न भागता लाखो भाविक सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभे आहेत.

Delhi News: हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुख्खु यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुख्खु यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याची सुख्खु यांची माहिती आहे.

Gauri Lankesh Death Case: पत्रकार गौरी लांकेश हत्या प्रकरण तीन आरोपींना कर्नाटक हायकोर्टाचा जामीन

पत्रकार गौरी लांकेश हत्या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना कर्नाटक हायकोर्टाचा जामीन मंजूर केला आहे. अमित दिघावकर, सुरेश आणि नवीन कुमार या तिघांना जामीन मंजूर कऱण्यात आला आहे. आरोपी मागच्या ६ वर्षांपासून जेलमध्ये आहेत.

NCP Crisis: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) जम्मू काश्मीरची विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) जम्मू काश्मीरची विधानसभा निवडणुक लढवण्याची शक्यता आहे.  निवडणुक लढवण्यासाठी पक्षाकडून चाचपणी सुरू असून प्रत्येक मतदार संघ निहाय आढावा बैठका घेण्यात येत आहेत. आगामी काळात उपमुख्यमंत्री अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल पटेल जम्मू काश्मीर दौरा करण्याची शक्यता. पक्षाच्या युथ विंग, विद्यार्थी आघाडी याच्याही पार पडल्या बैठका

Marathi Movie Producer Meet Ajit Pawar: 

मराठी चित्रपट निर्मात्यांनी घेतली अजित पवारांची भेट. मराठी चित्रपटांसाठी अनुदान देणारे चित्रपट समीक्षण समिती तत्काळ बरखास्त करण्याची केली मागणी. समितीमध्ये 28 सदस्य मात्र केवळ पाच सदस्य सिनेमा पाहून अनुदान द्यायचे की नाही याचा निर्णय घेत असल्याचा निर्मात्यांचा आरोप.

समितीमध्ये नातेवाईक नसावेत अशी सरकारची अट असताना देखील अभिनेत्री अलका कुबल आणि समीर आठल्ये समितीमध्ये कसे? अभिनेत्री गार्गी फुले यांचा सरकारला सवाल

समिती सर्व एकांगी निर्णय घेत असून महाराष्ट्र सरकारकडून कान्स फेस्टिवल ला पाठवण्यात आलेल्या तसेच राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या चित्रपटांना देखील अनुदानातून नाकारलेच कसं निर्मात्यांचा सवाल. निर्माते विशाल कुदळे यांनी आपल्या टकटक चित्रपटातील कलाकाराला राष्ट्रीय पुरस्कार मिळून देखील अनुदान दिलं नाही त्यामुळें वडिलांच्या वर्ष श्राद्धाला देखील पैसे देऊ शकलो नसल्याची खंत व्यक्त केली

Nandurbar News: नंदुरबारमध्ये सोयाबीनची आवक वाढली; भाव साडेचार हजारांवर

आज ना उद्या सोयाबीनचे भाव वाढतील या उद्देशाने बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन घरातच साठवून ठेवले होते परंतु भाव अजूनही वाढलेले नाहीत किमान 5000 रुपये भावाचे पेक्षा असली तरी आता खरीप हंगामात पेरण्यासाठी पैशांची अडचण निर्माण झाल्यामुळे भाव साडेचार हजारच भाव असूनही नाईलाज म्हणून काही शेतकरी घरात साठवून ठेवलेले सोयाबीन विक्रीसाठी काढत आहेत त्यामुळे शहादा बाजार समितीत रोजचे 50 ते 60 क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे.

Kalyan Water Crisis: कल्याणमधील पाणी प्रश्नावरुन मनसे आक्रमक; केडीएमसी कार्यालयावर मोर्चा

कल्याण मधील पाणी समस्येबाबत मनसे आक्रमक झाली असून केडीएमसीच्या कार्यलयावर मनसेचा मटका हंडा मोर्चा काढला आहे. केडीएमसी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मनसे कार्यकर्त्यांनी मटके फोडत अधिकाऱ्यांना गाजर दिले. यावेळी मनसेकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Gautala Sanctuary Closed: गौताळा अभयारण्य पर्यटकांसाठी बंद

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन दिवसांपासून चांगलाच पाऊस सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या गौताळा अभयारण्यात मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. या जोरदार पाऊस झाल्याने ऐतिहासिक सीताखोरी धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. सातमाळा डोंगररांगातून नैसर्गिक झरे, ओढे ओसंडून वाहते झाले. परंतु, १५ सप्टेंबरपर्यंत हे अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलेले आहे.

Pune News: पिंपरी गाव परिसरात चार ते पाच वाहनांची तोडफोड

पिंपरी चिंचवड शहरात वाहन तोडफोडीचं सत्र सुरुच आहे, आज पहाटे पुन्हा एकदा अशोक थिएटर पिंपरी गाव परिसरात अज्ञातांनी चार ते पाच वाहनांची तोडफोड केली आहे.

Kokan Railway: गोव्यात मुसळधार पाऊस; कोकण रेल्वे मार्गावरील तीन गाड्या रद्द

गोव्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने कोकण रेल्वे मार्गावरील तीन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. हवामान विभागाने गोव्यात रेड अलर्ट जारी केला असून गोव्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे, याचा परिणाम कोकण रेल्वे मार्गावर झाला आहे. कोकण कन्या, तुतारी, जनशताब्दी एक्स्प्रेस या तीन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाने ही माहिती दिली आहे.

Kolhapur Breaking: शाहू महाराज आणि सतेज पाटलांना विशाळगड परिसरात जाण्यास पोलिसांकडून मज्जाव

विशाळगड परिसरात जाण्यास खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांना पोलिसांनी अडवलंय. पांढरे पाणी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त आहे. शाहू महाराज आणि सतेज पाटील यांना विशाळगड परिसरात जाण्यास पोलिसांनी मज्जाव केलाय.

MPSC: MPSC मुख्य परिक्षेचा निकाल जाहीर 

एमपीएससीच्या मुख्य परिक्षेच्या निकालाची प्रतिक्षा आता संपली आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023- लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलाय.

Deccan Accident: गरवारे ब्रीजवरून कार खाली कोसळली, दोन जणांवर गुन्हा

पुण्यात डेक्कन येथील गरवारे ब्रीज येथे काल रात्री अपघात झाला. गाडी ब्रिजवरून खाली पडलीगाडीत दोन जण होते, त्यातील एक जण किरकोळ जखमी झालाय. चालक दारू पिऊन गाडीत चालवत असल्याचे पोलिसांचे म्हणणं आहे. ड्रंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल करणार आहेत. डेक्कन पोलिसांत दोन जणावर गुन्हा दाखल झालाय.

Accident News:  मुंबई पुणे महामार्गावर वारकऱ्यांच्या बसचा अपघात; मृत्युचा आकडा ७  वर 

मुंबई पुणे महामार्गावर बस आणि ट्रॅक्टरचा झालेल्या अपघातामध्ये झालेल्या मृत्युची संख्या सातवर पोहोचली आहे. अपघाताच्या वेळी पाचजणांचा जागीच मृत्यू झाला होता तर रुग्णालयामध्ये देखील दोन रुग्णांचा मृत्यू झालाय.

Maharashtra Poiltics: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीला रवाना

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीला रवाना झालेत. काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत. क्रॉस वोटिंगबाबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळतेय. तसेच आमदारांवर कारवाईबाबत चर्चा होणार असल्याची शक्यता आहे.

Ratnagiri News: गोवा महामार्गावरील बोगद्याच्या कामाची चौकशी करा, विनायक राऊतांचं PM मोदींना पत्र

मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याच्या कामाची चौकशी करा, असं पत्र विनायक राऊत यांनी पंतप्रधानांन मोदांना पाठवलंय. कशेडी बोगद्याचा कंत्राटदार आणि सरकारशी लागेबंध असल्याचा आरोप राऊत यांनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण प्रकरणात लक्ष घालावे, कारण भविष्यात मोठ्या दुर्घटनेची शक्यता असल्याचं राऊतांनी म्हटलंय.

Delhi Breaking:  मनीष सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाहीच, पुढील सुनावणी २९ जुलैला

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही. सिसोदिया यांच्या जामीनाबाबत 29 जुलैला सुनावणी होणार आहे. कोर्टाने ED आणि CBI ला नोटीस जारी केलीय. कोर्टाने दोघांकडूनही उत्तर मागवलं आहे.

Beed News: बाल वारकऱ्यांच्या दिंडीचा रिंगण सोहळा ; बीडमध्ये विठू नामाचा गजर

आषाढी एकादशीनिमित्त बीडच्या आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे बाल वारकऱ्यांची दिंडी काढण्यात आलीय. विशेष म्हणजे या दिंडीचा रिंगण सोहळा देखील गावातच पार पडला. त्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी वारकऱ्यांच्या वेशात सहभागी झाले होते.

Pune News:  काँग्रेस उपाध्यक्षांनी घेतली शरद पवारांची भेट

काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा बागुल यांनी शरद पवारांची भेट घेतली. आबा बागुल यांनी पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची मागणी केलीय. पर्वती विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडे आहे.

Nagpur Rain: नागपूर शहरात पावसाला सुरवात,  हवामान विभागाकडून येलो अलर्ट

नागपूर शहरात काही भागात पावसाला सुरवात झालीय. पुढील दोन दिवस विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आलाय. पावसाची असलेली तूट भरून निघेल का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

Baramati News : मोठी बातमी! खासदार सुनेत्रा पवार यांनी घेतली शरद पवारांची भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी आज शरद पवार यांची पुण्यातील मोदी बागेत भेट घेतली. त्यामुळे राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, शरद पवार यांच्यासोबत १ तास चर्चा केल्यानंतर सुनेत्रा पवार मोदीबाहेतून रवाना झाल्या आहेत.

Beed Accident: बीडच्या चौसाळा परिसरात ट्रक- दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू 

बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे सोलापूर - महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. गेल्याच आठवड्यात पाच वाहनांचा अपघात होऊन 3 जण ठार झाल्याची घटना बीड बायपासवर घडली होती. ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा धुळे- सोलापूर महामार्गावरील बीडच्या चौसाळा परिसरामध्ये ट्रक- दुचाकीचा भीषण अपघात झालाय.

मोठी बातमी! ३३ कोटी वृक्ष लागवड प्रकरणात सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चीट

३३ कोटी वृक्ष लागवड प्रकरणात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस सरकार काळात मुनगंटीवार यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता. या आरोपानंतर तत्कालीन महा विकास आघाडी सरकारने चौकशी समिती नेमली होती. दरम्यान, समितीच्या चौकशीत कुठलीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचा अहवाल देण्यात आला आहे.

Latur News : नीट पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपी गंगाधरला न्यायालयीन कोठडी

नीट परीक्षेत गुणवाढ करून देण्यासंदर्भात लातूरमध्ये चार आरोपींवरती गुन्हा दाखल आहे. यामध्ये मुख्य आरोपी असणारा गंगाधर हा चौकशीसाठी सीबीआयच्या कोठडीत होता, मात्र सीबीआयच्या कोठडीत असताना आरोपी गंगाधर हा सतत आजारी पडायचा. त्यामुळे त्याला चौकशीच्या काळात रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागत असल्याने आरोपीची तब्येत स्थिर होईपर्यंत आरोपी गंगाधर याला न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी CBI ने कोर्टापुढे केल्याने सीबीआयची मागणी मान्य करत आरोपी गंगाधर याला 19 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी कोर्टाने सुनावली आहे.

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस, १३ छोटी धरणे १०० टक्के भरली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत दमदार पाऊस लागला असून जिल्ह्यातील १५ धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. जिल्ह्यातील दोन मध्यम तर १३ लहान धरणे भरून वाहतायेत. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १५०० मिमी एवढा पाऊस पडला आहे. जिल्ह्यात दरवर्षी ३००० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडत असतो.

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प असलेले देवघर व कोर्ले-सातंडी धरणं आणि लघु प्रकल्प असलेली शिवडाव, आंबोली, हातेरी, माडखोल, सनमटेंब, हरकुळ, ओझरम, निळेली, पावशी, पुळास, लोरे, शिरवळ या १३ धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे.

जिल्ह्यातील ही १३ छोटी धरणे १०० टक्के भरली आहेत तर देवघर व कोर्ले ही दोन्ही धरणे ६० टक्केपेक्षा जास्त भरून गेली आहेत. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या जवळपास ५० टक्के पाऊस लागला असून समाधानकारक पाणीसाठ्याचा संचय झाला आहे.

Maharashtra Politics : विधानपरिषदेत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांची लकरच होणार हकालपट्टी?

विधानपरिषदेत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केली होती. या आमदारांची लकरच हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. १९ जुलैला रोजी के सी वेणुगोपाल आणि प्रभारी रमेश चैन्नीथला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याआधी ही कारवाई होण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी नाना पटोले दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडूंब

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, सोयगाव तालुक्यात काल दिवसभर मुसळधार पाऊस झाला. आजही हलकासा पाऊस सुरू आहे. या पावसाच्या पाण्यामुळे जरंडीच्या धिंगापूर धरणाच्या पाणीपातळी धोक्याबाहेर गेली आहे. त्यामुळे धिंगापूर धरणातून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. धरणातील पाणी सुकी नदीच्या पात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे सुकी नदी आता दुथडी भरून वाहत आहे.

Mumbai Local Train : मध्य रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने, बदलापूर स्थानकात प्रवाशांची गर्दी

मध्य रेल्वेची रेल्वे सेवा १० ते १५ मिनिटं उशिराने सुरू आहे. सतत होणाऱ्या त्रासामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. बदलापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. कामावर निघालेल्या चाकरमानी वर्गांचे मोठे हाल होत आहे.

Pandharpur News : चंद्रभागेच्या स्नानासाठी भाविकांची झुंबड

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर मध्ये लाखो भाविक दाखल झालेले आहेत. चंद्रभागेच्या पवित्र स्नानासाठी नदीचा तीर गर्दीने फुलून गेलेला आहे. नदीच्या दोन्ही तीरावर स्नानासाठी भाविकांची अक्षरशः झुंबड उडालेली आहे.

उद्या आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होत असताना आज दशमीच्या दिवशी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये विठू नामाचा जयघोष सुरू आहे.

Hingoli News : हिंगोलीच्या लोहरा परिसरातील तलाव ढगफुटी होऊन फुटला

हिंगोली जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे लोहरा परिसरात जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या हद्दीतील तलाव फुटला आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झालं. तलावाच्या पाण्याच्या प्रवाहाने शेती उपयोगी साहित्य व शेतातील विद्युत रोहित्र देखील वाहून गेले आहे.

Mumbai Traffic Updates : ठाणे ते विक्रोळीपर्यंत मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे वाहनचालकांचे मोठे हाल होत आहे. सोमवारी मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. आता सोमवारी पहाटे देखील ठाणे ते विक्रोळी पर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

रस्त्यावर पडलेले खड्डे ,सिग्नल यंत्रणा आणि टोलनाक्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. वाहनांच्या 3 ते 4 किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Chhatrapati Sambhajinagar News : आषाढी एकादशीनिमित्त छोटे पंढरपूर सजले; भाविकांची होणार मोठी गर्दी

आषाढी एकादशीच्या निमित्ताने छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वाळूज पंढरपूर मंदिर संस्थांच्या पदाधिकाऱ्यासोबतच आता पोलीस यंत्रणा देखील सज्ज झालीय. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने 20 सीसीटीव्ही कॅमेऱ्यात वाढ करण्यात आली असल्याने यामुळे 50 कॅमेऱ्यांसह 2 ड्रोन कॅमेराद्वारे तीक्ष्ण नजर ठेवली जाणार आहे.

विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी पंचक्रोशीतून लाखोंच्या संख्येने भाविक या प्रति पंढरपुरात दाखल होत असतात.त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली असून पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी देखील पाहणी केली.

Mumbai Rain : मुंबईसह उपनगरात आजही मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून आँरेंज अर्लट

मुंबईसह महाराष्ट्रात आज देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज मुंबई व उपनगर तसेच ठाणे, पालघर जिल्ह्यांना आँरेंज अर्लट तर रायगड जिल्ह्याला आज रेड अर्लट

पश्चिम बंगालच्या निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. हवामान खात्याने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

Konkan Railway News : कोकण मार्गावरील अनेक मेल एक्सप्रेस गाड्या रद्द

मागील आठवडाभरापासून कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका कोकणकरांना बसलाय. कोकण मार्गावरील अनेक मेल एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काहींचे वेळापत्रक बदलण्यात आलं आहे. दादर- सावंतवाडी मेल एक्सप्रेस रद्द, तर सीएसएमटी- मडगाव एक्सप्रेसचे वेळापत्रकावर परिणाम, तसेच दादर शिर्डी मेल एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com