Maharashtra News Live Update: मुळशी तालुक्यात अज्ञात व्यक्तींनी लावले डोंगरांना वणवे

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण, बारामती-राहुरी पोटनिवडणूक अपडेट, सुनेत्रा पवार, अक्षय कर्डिले, पार्थ पवार, राज्यातील राजकिय, राज्यासह देश-विदेशातल्या ताज्या घडामोडी जाणून घ्या....
Maharashtra Live News Update :
Maharashtra Live News Update :Saam Marathi
Published On

ED मुंबईची मोठी कारवाई; हिरेन भानू व कुटुंबीयांच्या 33 मालमत्ता जप्त

122 कोटींच्या बँक घोटाळ्यात ED ची कारवाई;

जप्त मालमत्तेची किंमत सुमारे 16.95 कोटी

प्रकरण 122 कोटींच्या बँक निधी अपहाराशी संबंधित

EOW मुंबईने दाखल केलेल्या FIR वरून ED ने सुरू केला तपास

NICB बँकेचे माजी GM हितेश मेहता यांची मुख्य भूमिका उघड

अल्पवयीन मुलींशी छेडछाड; शिक्षक महादेव मानतोडे निलंबित...

बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव परिसरात अल्पवयीन मुलींची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणातील आरोपी शिक्षक महादेव आत्माराम मानतोडे याला शिक्षण विभागाने तातडीने निलंबित केले आहे.

पीडित मुलींनी घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी शाळेकडे धाव घेतली होती. परिस्थिती तणावपूर्ण बनली होती.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून सहा जणांची माघार

बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत एकूण ५३ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते त्यापैकी सहा जणांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. आता अर्जाची संख्या 47 राहिली आहे.

मुळशी तालुक्यात अज्ञात व्यक्तींनी लावले डोंगरांना वणवे

मुळशी तालुक्यात अज्ञात व्यक्तींकडून डोंगरांना वणवे लावले जात आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वनस्पतींचा नाश होत आहे. उन्हाळ्यात दरवर्षी हा प्रकार घडत असतो. वणव्याने जंगलातील प्राण्यांना धोका निर्माण होत असतो.

पुण्याच्या आजपासून ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा बिगुल

  • निवडणूकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात..

  • यासाठी भोर तहसील कार्यलयाच्या परिसरात या निवडणुकांसाठी कक्ष तयार करण्यात आला असून, निवडणूकांसाठी इच्छुक असलेले उमेदवार.

  • उमेदवारी अर्ज खरेदी करण्यासाठी आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दाखल होण्यास सुरुवात झालीय

72 कोटींचा पूल वाहतुकी विना पडून, तांत्रिक अडचणी मूळे वाहतूकिसाठी पूल सुरू होण्यास विलंब

हिंगोली परभणी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या येलदरी पुलाचे गेल्या अनेक महिन्यांपासून काम पूर्ण झाले आहे मात्र अद्याप देखील प्रशासकीय यंत्रणेच्या बेरजबाबदारपणामुळे बहात्तर कोटींचा पूल वाहतुकी विना तसाच पडून आहे

परभणीच्या सोनपेठ मध्ये वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाच्या धडकेत महिला सफाई कामगाराचा मृत्यू, एक गंभीर

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहरातील सोनखेड परिसरात आज सकाळी भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.

नगर परिषदेच्या दोन महिला सफाई कामगार रस्त्याची साफसफाई करत असताना वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव हायवाने त्यांना जोरदार धडक दिली.

या अपघातात तुळसाबाई दत्ता पाडुळे (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला, तर धूपताबाई सूर्यभान वाघमारे या गंभीर जखमी झालेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वा खाली महाराष्ट्र जिहाद मुक्त केल्या शिवाय स्वस्त बसणार नाही - नितेश राणे

सरकार जिहादच्या विरोधातील लढाईची धार कमी करणार नाही

० देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वा खाली महाराष्ट्र जिहाद मुक्त केल्या शिवाय स्वस्त बसणार नाही

० पुणे येथील गोपिचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांचा मोर्चा आडवल्याच्या मुद्द्यावरून नितेश राणे आक्रमक

० काही अधिकारी सरकारची, पोलिसांची बदनामी करत आहेत, जिहाद्यांना मदत करताहेत

० त्यांना संध्याकाळची बिर्यानी जास्तीच आवडते

लातूरच्या जळकोट तालुक्यातील शेलदरा येथे शेतीच्या वादातून पोलिसासमोर फ्रीस्टाइल हाणामारी

लातूरच्या जळकोट तालुक्यातील शेलदरा येथे शेतीच्या वादातून दोन गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाली आहे, पोलीस बंदोबस्तात शेतीची मोजणी करत असताना, दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक करत हाणामारी झाली, या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे,

ठाण्यातून मुंबईच्या दिशेला जाणारी वाहतूक खोळंबली...

ठाण्यातील कोपरी उड्डाण पुलावर साकेत उन्नती पुल मार्ग कामकाजा दरम्यान आणलेली भली मोठी क्रेन अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या एका बाजूला झाली. त्यामुळे कोपरी उड्डाणपूल ते तीन हात जंक्शन इथपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाहतूक विभाग मॅन्युअल पद्धतीने वाहतूक नियंत्रणात आणण्याकरिता करत आहेत.

पुण्यातील मुळशी धरणात गोणवडीजवळ एका तरुणाचा बुडून मृत्यू

पुण्यातील मुळशी धरणात गोणवडीजवळ एका तरुणाचा बुडून मृत्यू

ऋषभ राजू बनसोडे (वय १७, औंध, बौद्धविहारजवळ, खडकी, पुणे) असं बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव

मुळशी धरण परिसरात फिरायला गेलेला असताना ऋषभचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल होत शोधकार्य करून बुडालेल्या तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला..

मृतदेह पौड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती

मुळशीच्या पौड पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू

पुण्याच्या नवले पुलाजवळ पुन्हा अपघात, वाहनांचं मोठं नुकसान

नवले पुलाजवळ अपघात झाला आहे. भुमकर चौकात आज दुपारी हा अपघात घडला आहे.

 कल्याणच्या रेल्वेच्या सुरक्षा रक्षकांनी वाचवला एका प्रवाशाचा जीव

कल्याणच्या प्लॅटफॉर्म नंबर चार वर एक्सप्रेस परवा सकाळी साडेनऊ वाजता प्लॅटफॉर्म मध्ये आल्यानंतर अश्विनी बर्वे हा प्रवासी चहा घेण्यासाठी उतरला असताना अचानक एक्सप्रेस सुरू झाली .

गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीवर टांगती तलवार कायम

गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीवर टांगती तलवार कायम राहिल्याचे चित्र दिसत आहे. निवडणुका लवकर घ्या ही दूध संस्था प्रतिनिधीची मागणी कोर्टनी फेटाळली.

चोरून अशोक खरातंकडे गेलेले, नाव येईल या भीतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाहीत - राजू शेट्टींची टीका 

अशोक खराताकडे सगळेच लोकप्रतिनिधी चोरुन जाऊन आलेत.. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेतील लोकप्रतिनिधी आपले नाव येतंय का ? यातुन अवकाळी प्रश्नावर बोलायला तयार नाहीत.. अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका, शासनाला अहवाल सादर

धुळे जिल्ह्यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीचे अहवाल अखेर राज्य सरकारला सादर करण्यात आले आहे.

अंबाजोगाईत भीषण अपघात, भरधाव ट्रकच्या धडकेत बँकेच्या अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू

अंबाजोगाई शहरातील रिंग रोडवरील मानवलोक कार्यालयाजवळ आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात दीनदयाळ बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुदर्शन टाक (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला.

चिंचवड येथील मोहन नगर परिसरात अचानक MNGL कंपनीच्या PNG गॅस पाईप लाईनचा स्फोट, एक जण गंभीर जखमी

पिंपरी चिंचवड शहरातील मोहन नगर परिसरामध्ये अचानक PNG स्फोट झाला आहे. दुपारी एक वाजता दरम्यान मोहन नगर मधून जाणाऱ्या पीएनजी गॅस पाईपलाईन चा अचानक मोठा स्फोट झाला.

या स्फोटात पीएनजी गॅस पाईपलाईन वर असलेली माती आणि दगड हवेत फेकल्या गेल्याने त्याचं वेळी रस्त्यावरून दुचाकीने जणारा एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.

पीएनजी गॅस पाईपलाईन स्फोट होत असतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहेत

PUNE : आरोग्य उपसंचालकांकडून प्रादेशिक मनोरुग्णालयातील बातमीची दखल

प्रादेशिक मनोरुग्णालयातील बातमीची दखल आरोग्य उपसंचालक यांनी घेतली

साम टीव्हीने बातमी दाखवताच आरोग्य उपसंचालक भगवान पवार मनोरुग्णालयात पाहण्यासाठी दाखल

जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार

मनोरुग्णालयातील सफाई ही रुग्णांकडून करून घेतली जात असल्याची दाखवली ती बातमी

Pune : हिंदू जनआक्रोश मोर्च्यात जाण्याआधी आमदार गोपीचंद पडळकर यांना पोलिसांनी अडवलं

पुण्यातील सासवड ते कोंढवा दरम्यान हिंदू जनआक्रोश मोर्चा आणि रॅलीचे आयोजन

गोपीचंद पडळकर यांना पुणे पोलिसांकडून विनंती करण्यात येत आहे.

त्यांना खडी मशीन चौकात येण्यापूर्वीच पोलिसांनी अडवलं

Tuljapur : तुळजापुरात एका कार्यक्रमात भोजन केलेल्या १९ महिलांसह ३ पुरुष, २ लहान मुलांना विषबाधा

तुळजापूर तालुक्यातील कदमवाडीत सुहासिनीच्या जेवनाच्या कार्यक्रमात भोजन केलेल्या १९ महिलांसह ३ पुरुष व २ लहान मुलांना विषबाधा

उलटी,मळमळ,चक्कर,पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने तुळजापूरमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

सुहासिनी जेवनाच्या कार्यक्रमात भाकरी, वरणभात,बेसनवडी,खीर खाल्यानंतर त्रास सुरू झाल्याची महिलांची माहिती

रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती

jalgaon : जळगावात अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार

जळगावच्या धरणगाव मध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

शिक्षकाविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

शिक्षकाला पीडित विद्यार्थिनीसह तिचे कुटुंबीय काठीने मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे..

Beed : शेतकरी आत्महत्या प्रकरणात मोठा निर्णय; तालुका स्तरावर होणार चौकशी समिती

राज्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणांतील मदतीचा पेच सोडवण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आता आत्महत्यांची चौकशी थेट तालुका स्तरावर होणार आहे. तालुका समितीकडून छाननी करून प्रस्ताव जिल्हा समितीकडे पाठवले जाणार आहेत. त्यामुळे निर्णय प्रक्रियेला गती मिळून शेतकरी कुटुंबांना तातडीने मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Latur : लातूरमध्ये मद्यधुंद दुचाकीस्वाराने लहान मुलाला उडवले; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

लातूरच्या आनंद नगर भागातून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या एका लहान मुलाला, पाठीमागून येणाऱ्या दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. या धडकेत मुलगा गंभीरित्या जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. धडक देऊन दुचाकीस्वार फरार झालाय.

nanded : तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्याच्या मागणीवरून नांदेडमध्ये आंदोलन 

तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी दिव्यांगाचे नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन सूरू

तुकाराम मुंढे यांची बदली रद्द झालीच पाहिजे, अशी आंदोलकांची मागणी

पोलिसांचा मोठा बंदोबस्त.

जिल्हाधिकारी कार्यालयात विधिमंडळ अंदाज समितीची बैठक सुरू

दिव्यांग बांधव हे अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या बदलीवरून आक्रमक

Nagpur : दृष्टीहीन जलतरणपटू ईश्वरी पांडे हिने रचला इतिहास

- दृष्टीहीन जलतरणपटू ईश्वरी पांडे हिने अतिशय कठीण,आव्हानात्मक तलाईमन्नार (श्रीलंका) ते धनुष्कोडी पाल्क सामुद्रधुनी पार करून इतिहास रचला.

- अद्भुत धैर्य आणि जिद्दीचे प्रदर्शन करत नागपूरची कन्या १७ वर्षीय दृष्टीहीन जलतरणपटू ईश्वरी पांडे हिने पाल्क सामुद्रधुनी पार करून इतिहास रचलाय.

Akola fire : अकोल्यात काढणीला आलेल्या गव्हाच्या शेतीला मोठी आग

अकोला जिल्ह्यात काढणीला आलेल्या गव्हाच्या शेतीला मोठी आग लागली आहे.. बार्शीटाकळी तालुक्यातील पिंपळगाव हांडे शेतशिवारात 4 एकर शेतातील काढणीला आलेला गहू पिक आगीत पूर्णतः जळला आहे.. तर तर कापणी करून शेतात ठेवलेला गुहू देखील यात जळाला आहे.. शेतातून विद्युत पोल झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याचे बोलल्या जाते. 45 ते 50 क्विंटल गहू जळून खाक झाला आहे., यात गहू उत्पादक शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.. गावकऱ्यांसह परिसरातील शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा मोठा प्रयत्न केलाय, मात्र तोपर्यंत शेतातील संपूर्ण गहू पीक या आगीच्या आटोक्यात आलं होतंय..

pune : ...तर नगरसेवक पदच रद्द होईल; आयुक्त नवलकिशोर राम यांचा इशारा

पुणे महापालिकेत पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या नगरसेवकांना थेट अपात्रतेचा सामना करावा लागणार असल्याचा इशारा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिलाय. त्यामुळे महापालिकेत शस्त्रांसह येणाऱ्यावर आता कठोर निर्बंध लागू होणार आहेत.या अनुषंगाने महापालिकेत मेटल डिटेक्टर बसवण्यात आले आहेत.

Kolhapur: गॅस सिलेंडर नंतर आता कोल्हापुरात मटन घेण्यासाठी नागरिकांची रांग

गॅस सिलेंडर नंतर आता कोल्हापुरात मटन घेण्यासाठी नागरिकांची रांग

कोल्हापुरातील शिवाजी पेठेत लागली मटण घेण्यासाठी नागरिकांची रांग

हनुमान जयंती नंतर शिवाजीपेठेची माहि (यात्रा) असल्याने नागरिकांची मटन घेण्यासाठी लागली रांग

माहीचं निमित्य साधत 800 रुपये किलो प्रमाणे विकले जाणार मटण मिळत आहे 620 रुपये किलो...

मटन घेण्यासाठी नागरिकांची तुडुंब रांग

Pandharpur: पंढरपूर विभागाच्या ठाकरे सेना जिल्हाध्यक्षपदी संभाजी शिंदे यांची निवड

पंढरपूर विभागाच्या ठाकरे सेनेच्या जिल्हा अध्यक्षपदी संभाजी शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. संभाजी शिंदे यांची उध्दव ठाकरे यांचे कट्टर समर्थक अशी ओळख आहे. गेल्या 30 वर्षांपासून ते शिवसेनेत सक्रिय आहेत. संभाजी शिंदे यांची पुन्हा पंढरपूर जिल्हा विभागाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने शिवसैनिकांमधून स्वागत केले जात आहे.

Kandivli: कांदिवली लिंक रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी

कांदिवली लिंक रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी

कांदिवली डहाणूकर वाडी मेट्रोस्थानक ते मालाड वळणई मेट्रो स्टेशनपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा

वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

मिळालेल्या माहितीनुसार, पोईसर नदीवरील पुलावरील टर्निंग प्वाइंट अचानक बंद झाल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे.

Ashok Kharat:अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी

खरातला दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी

तिसऱ्या गुन्ह्यात SIT खरातचा ताबा घेणार, त्यानंतर 24 तासाच्या आत पुन्हा कोर्टात हजर करणार

तिसऱ्या गुन्ह्यात सुनावणीवेळी पोलीस कोठडीची मागणी करणार

Gowandi: गोवंडीतील शिवाजी नगरमध्ये अवैध झोपड्यांवर BMC ची मोठी कारवाई

गोवंडीतील शिवाजी नगरमध्ये अवैध झोपड्यांवर BMC ची मोठी कारवाई

मुंबईतील गोवंडी परिसरातील शिवाजी नगर, लोकशाही अण्णा भाऊ साठे नगरजवळील डब्बा वाला कंपाउंड येथे उभारण्यात आलेल्या हजारो अवैध झोपड्यांवर मुंबई महानगरपालिकेकडून तोडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.

या कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.दरम्यान, काही स्थानिक नागरिक आपल्या झोपड्या वाचवण्यासाठी BMC आणि पोलिसांच्या कारवाईला विरोध करताना दिसत आहेत.

परिस्थिती तणावपूर्ण असून, कारवाई पूर्ण करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करण्याची वेळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या प्रशासनाकडून कारवाई सुरू असून परिसरात तणावाचे वातावरण आहे.

Ashok Kharat: भोंदू अशोक खरातला सत्र न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करणार

भोंदू अशोक खरातला थोड्याच वेळात सत्र न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करणार

SIT पथक खरातला घेऊन नाशिकच्या पोलीस अकॅडमीत दाखल

यापूर्वी न्यायालयाने दुसऱ्या गुन्ह्यात ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती

आज कोठडी वाढणार की न्यायालयीन कोठडी? निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

SIT कडून तिसऱ्या गुन्ह्यात पोलिस कोठडीसाठी जोरदार युक्तिवाद करण्याची शक्यता

SIT चे अधिकारी कोर्टात पोहचले

सरकारी वकील शैलेंद्र बागडे न्यायालयत हजर

Amravati: ऐन लग्नसराईच्या काळात अमरावतीत फुलांचे दर घसरले..

ऐन लग्नसराईच्या काळात अमरावती फुलांचे दर घसरले..

गुलाबाचे दर 150 रुपयावरून 50 रुपये किलोवर तर झेंडूचे फुलहि 80 वरून 20 रुपये किलोवर...

आर्टिफिशियल फुलांमुळे नैसर्गिक फुलांच्या विक्रीत घट; आर्टिफिशियल फुलांवर बंदी असतानाही बाजारपेठेत आर्टिफिशियल फुलांची सरासरी...

नैसर्गिक फुलांचे भाव उतरल्याने शेतकऱ्यांच मोठं नुकसान..

अमरावतीत सराफा दुकानावर दरोडा टाकणाऱ्या सात आरोपींना अटक, एक कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत...

अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत 13 मार्च रोजी सराफा दुकानावर दरोडा पडल्याची घटना घडली होती. यातील सात आरोपींना अवघ्या काही तासातच बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले.

अटक केलेल्या आरोपींच्या ताब्यातून 661 ग्रॅम सोन्याचे दागिने, 1 लाख 19 हजार रुपये रोख, वाहनं, मोबाईल आणि शस्त्र असा एकूण 1 कोटीहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त केला करण्यात आलाय... तर सातही आरोपींविरोधात गाडगे नगर ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत... पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानंतर फिर्यादीला परत देण्यात आलाय.

Solapur: अंजनगाव येथील विनपरवाना पुतळा बसवल्याप्रकरणी पोलिसांकडून तिसरी अटक

सोलापूर -

माढा तालुक्यातील अंजनगाव येथील विनपरवाना पुतळा बसवल्याप्रकरणी पोलिसांकडून तिसरी अटक

धाराशिव जिल्ह्यातल्या तांदूळवाडी गावात राहणाऱ्या ऍड. प्रणित डिकळे याला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी केली अटक

अंजनगाव येथे पुतळा बसवल्यानंतर प्रक्शोभक भाषण केल्याप्रकरणी ऍड. प्रणित डिकळे याला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी केली अटक

Buldhana: नागापूरमध्ये जल जीवन मिशनचा बट्ट्याबोळ, महिलांची पाण्यासाठी आजही पायपीट

बुलडाणा -

नागापूरमध्ये जल जीवन मिशनचा बट्ट्याबोळ, महिलांची पाण्यासाठी आजही पायपीट

मेहकर तालुक्यातील नागापूर येथे जल जीवन मिशन योजनेचा फज्जा उडाल्याचे वास्तव समोर आले आहे.

सुमारे १.२५ कोटींचा निधी खर्चूनही गावात अद्याप पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. महिलांना आजही पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

दरम्यान, आमसभेत योजना पूर्ण झाल्याचा अधिकाऱ्यांचा दावा प्रत्यक्ष परिस्थितीशी विसंगत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

Solapur: सोलापुरात एलपीजी ऑटो रिक्षाच्या पंपासमोर लांबच लांब रांगा

सोलापूर -

आखाती देशात सुरु असणाऱ्या युद्धामुळे सोलापुरात एलपीजी ऑटो रिक्षाच्या पंपासमोर लांबच लांब रांगा

मागील 15 ते 20 दिवसांपासून सोलापुरात बंद होते एलपीजी गॅस पंप बंद

त्यामुळे आज सोलापुरातील सर्व 'गो गॅस एलपीजी' पंपासमोर पहाटेपासून सुरु आहेत ऑटो रिक्षाच्या रांगा

मागील 15 ते 20 दिवसांपासून एलपीजी गॅस पंप बंद असल्याने सोलापुरातील तब्बल 18 हजार ऑटो रिक्षाचालकांवर आली होती बेरोजगारीची वेळ

मात्र आजपासून गॅस पंप सुरु झाल्याने ऑटो रिक्षा चालकांना कांही अंशी मिळाला आहे दिलासा

Baramati: बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची आशा मावळल्याने राष्ट्रवादी लागली कामाला

बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची आशा मावळल्याने राष्ट्रवादी लागली कामाला

बारामती विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली...

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शनिवारी कन्हेरी येथील मारुती मंदिरात दर्शन घेऊन फोडणार प्रचाराचा नारळ

तब्बल काँग्रेसच्या उमेदवारासह 53 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात.

Pune: हार्दिक पांड्या विरोधातील तक्रार अर्ज अहमदाबाद पोलिसाकडे वर्ग

पुणे -

हार्दिक पांड्या विरोधातील तक्रार अर्ज अहमदाबाद पोलिसाकडे वर्ग

पांड्या विरोधात भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती

वकील वाजेद खान यांनी ही तक्रार दाखल केली होती

८ मार्च ला अहमदाबाद येथील स्टेडिएम मध्ये झालेल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता

त्यांनतर जल्लोष करताना हार्दिक पांड्या याने त्यांच्या मैत्रिणीसोबत राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप करत पुण्यात त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती

Konkan: उष्णतेमुळे आंबा लवकर पिकू लागल्याने बाजारभावात मोठी घसरण

उष्णतेमुळे आंबा लवकर पिकू लागल्याने बाजारभावात मोठी घसरण

कोकणातील हापूस आंबा यंदा दुहेरी संकटात सापडला आहे.

एकीकडे अवकाळी पाऊस व दमट वातावरणामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे,

तर दुसरीकडे कडक उष्णतेमुळे आंबा अपेक्षेपेक्षा लवकर पिकू लागल्याने बाजारभावात मोठी घसरण झाली आहे.

मार्च मध्ये वाशीतील APMC मार्केटमध्ये पाच डझनांच्या पेटीला तब्बल ७ हजार रुपये दर मिळालेला हापूस अवघ्या आठ दिवसांतच अडीच ते ३ हजार रुपयांवर घसरला आहे.

Nashik: भोंदू अशोक खरातच्या नावावर तब्बल १०० मालमत्ता, किंमत जवळपास २०० कोटींहून अधिक

नाशिक -

- भोंदू अशोक खरातच्या नावावर तब्बल १०० मालमत्ता, किंमत जवळपास २०० कोटींहून अधिक

- कुटुंबीयांच्या नावावरही ७० हून अधिक प्रॉपर्टी, तपासात मोठे खुलासे

- दैवी शक्तीच्या नावाखाली भीती दाखवून जमिनी मिळवल्याचा आरोप

- महागडे ‘खडे’ विकून भक्तांची फसवणूक केल्याचंही उघड

- ईडीकडे ३५ मालमत्तांची कागदपत्रे, आर्थिक तपास वेगात सुरू

Nagpur: नागपूर शहरातील अनेक भागांत सकाळी ७ ते दुपारी १.३० दरम्यान वीज बंद

नागपूर -

- उन्हाळ्यात अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरणकडून देखभाल-दुरुस्तीची कामे सुरू.

- आज शहरातील अनेक भागांत सकाळी ७ ते दुपारी १.३० दरम्यान वीज बंद

- वीजवाहिन्यांची दुरुस्ती, देखभाल, झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जाणार.

- काँग्रेसनगर, स्वावलंबीनगर, दीनदयालनगर, जयप्रकाशनगर, सीतानगर आदी भाग प्रभावित.

Pune: पुणे परिसरात तीन दिवस उकाडा वाढणार

पुणे -

पुणे परिसरात तीन दिवस उकाडा वाढणार आहे

कामाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे

चार दिवस हवामानात बदल पाहायला मिळतील

गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने पुणे शहरात मुसळधार पावसाने लावली होती हजेरी

आता तापमानात होणार वाढ

Solapur: सोलापुरातील अवंती नगरमध्ये दुचाकीवरून येत चेन स्नॅचिंगचा प्रकार

सोलापूर -

- सोलापुरातील अवंती नगरमध्ये दुचाकीवरून येत चेन स्नॅचिंगचा प्रकार

- वॉकिंग करत असताना वृद्ध महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी लांबवले

- विजयालक्ष्मी सावळे असे यां पिडीत महिलेचे नाव आहे.

- दरम्यान घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांच्या 15 टीम चोरट्यांच्या शोधासाठी रवाना झाल्यात

Nagpur: राज्यात अवैध पॅथॉलॉजी लॅब्स नाहीत हे सिद्ध करा, हायकोर्टचे राज्य सरकारला आदेश

नागपूर -

- राज्यात अवैध पॅथॉलॉजी लॅब्स नाहीत हे सिद्ध करा, हायकोर्टच्या नागपुर खंडपीठाचे राज्य सरकारला आदेश

- २३ एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सोबत आवश्यक पुरावे सादर करण्याचेही आदेश

- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची सुनावणी, जनहित याचिकेवर महत्त्वाचा निर्णय

- सरकारचा दावा राज्यात अवैध लॅब्स नाहीत, न्यायालयाने पुरावे मागवले

- यवतमाळच्या सामाजिक कार्यकर्त्याची याचिका अवैध लॅब्सवर कारवाईची मागणी

Nagpur: नागपूर शहर काँग्रेसमध्ये १२ वर्षांनंतर नेतृत्व बदलाचे संकेत

नागपूर -

- नागपूर शहर काँग्रेसमध्ये १२ वर्षांनंतर नेतृत्व बदलाचे संकेत

- विद्यमान अध्यक्ष आ. विकास ठाकरे पद सोडण्याच्या तयारीत.

- आपल्या गटातील नेत्यालाच अध्यक्षपद मिळावे यासाठी प्रयत्न.

- गिरीश पांडव, विशाल मुत्तेमवार, अतुल कोटेचा, प्रशांत धवड यांचे नाव चर्चेत.

- ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत नव्या अध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू.

Dharashiv: येरमाळा येथील श्री येडेश्वरी यात्रेच्या समारोप कार्यक्रमात गोंधळ

धाराशिव -

येरमाळा येथील श्री येडेश्वरी यात्रेच्या समारोप कार्यक्रमात गोंधळ

येडेश्वरी देवीची मानाची पालखी घेऊन जाणाऱ्या खांदेकऱ्यांना मारहाण

मारहाणी वरून गावात तणाव, मारहाण करणाऱ्या तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी येरमाळा गावचे गावकरी जमले येरमाळा पोलीस स्टेशन समोर

गुंडावर कार्यवाही करा या मागणीसाठी गावकऱ्यांनी सुरू केला रास्ता रोको व ठिय्या आंदोलन

येरमाळा पोलीस स्टेशन समोर गेल्या अडीच तासापासून गोंधळ

Solapur: अंजनगाव पुतळा प्रकरणी कारवाई, बाळराजे आवारेसह आणखी एक सहकारी पोलिसांच्या ताब्यात

सोलापूर -

अंजनगाव पुतळा प्रकरणी आणखी एक कारवाई

अंजनगावला पुतळा पाठवणाऱ्या बाळराजे आवारेसह आणखी एक सहकारी पोलिसांच्या ताब्यात

संभाजी आघाव असे सोलापूर ग्रामिण पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नावं

माढा पोलिसांकडून आघाव याच्या अटकेची कारवाई सध्या सुरूय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com