

deepali sayed Latest News: शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या हातातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद निसटले. शिंदे गटाच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद गमवावे लागले. आता राज्याचा कारभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताब्यात आहे. याचदरम्यान, अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी उद्धव ठाकरे यांना शिंदे-फडवीस यांच्यासोबत जाण्याचा सल्ला दिला आहे. (Latest Marathi News)
दीपाली सय्यद यांनी कोल्हापुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांच्या राजकारणावर भाष्य करताना दीपाली सय्यद म्हणाल्या, 'आपण सूत्र कुणाच्या हातात देतो हे उद्धव ठाकरे यांनी पाहायला हवं होतं. त्या वेळचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवारच सगळा कारभार बघत होते. त्यामुळे शिवसैनिक अस्वस्थ होते. शिवसेनेचा भार हा राष्ट्रवादीकडे चालल्याने उद्धव ठाकरे एकटे पडले'.
'उद्धव ठाकरे संजय राऊतांचं इतकं ऐकत आहेत की इकडे येण्याबाबत ते विचारही करायला तयार नाहीत. उद्धव ठाकरे यांनी डबल इंजिन सरकारसोबत येण्यासंदर्भात विचार करावा, असा सल्ला सय्यद यांनी दिला.
'मी शिवसेनेचीच आहे शिवसेनेतच आहे त्यामुळे माझ्या प्रवेशाचा प्रश्न येत नाही. एक दिवसात ते तिथे जाऊन येऊ शकतात तर काहीही होऊ शकतं, ही राजकारणाची खेळी आहे. इथे प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ बघत आहे,असे भाष्य राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना युतीच्या चर्चांवर दिपाली सय्यद यांनी उत्तर दिले आहे.
पाकिस्तानचं नागरिकत्व स्वीकारले असल्याचा आरोपावर प्रत्युत्तर देताना म्हणाल्या, 'महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा मी करू नये म्हणून माझ्या बदनामीच षडयंत्र रचले जात आहे. माझे फोटो मॉर्फ करून पाकशी संबंध दाखवण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. माझी बदनामी करण्यामागे राजकीय शक्ती असल्याचा मला संशय आहे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.