CM Eknath Shinde : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पहिल्यांदाच अयोध्या दौरा केला आहे. अयोध्येत आल्यानंतर ते आपल्या भाषणात जनतेशी संवाद साधताना नेमके काय बोलणार याकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अशात विरोधकांवर टीका करताना यावेळी मुख्यमंत्र्यांनी थेट दाउदचं नाव घेतलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (Eknath Shinde)
रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर निशाना साधताना म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मी आभारी आहे. लोकांच्या भावना ओळखून त्यांनी राम मंदीरचा विषय मार्गी लावला आहे. काश्मिरमध्ये ३७० हटवलं मात्र आतापर्यंत हे कलम हटवण्यात कनेकांनी अडचणी आणल्या आहेत. बाळासाहेबांचे स्वप्न ज्यांनी पुर्ण केलं त्यांच्यासोबत आम्ही सरकार स्थापन केलं. ज्यांचे दाऊदसोबत संबध आहेत. त्यांच्यासोबत सरकार तोडून आम्ही वेगळं सरकार स्थापन केलं, असा घणाघात मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे.
लक्ष्मण किला परिसरात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राम मंदीर बन रहा है आयोध्यापर अब तो भगवा लेहराएगा पुरे हिंदुस्थानपर अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. तसेच पुढे ते म्हणाले की, माझ्यासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. सर्व महंतांनी मला आशिर्वाद दिलाय. आयोध्या नगरीचे प्रमुख गोपाळदास महाराज हे तब्येत ठिक नसताना ते मला आशिर्वाद देणयासाठी आले त्यांचा मी आभारी आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
राम मंदीर हा आमच्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही तर आस्थेचा विषय आहे. काही वर्षांपूर्वी राम मंदीरचं नाव काढायला लोकं घाबरत होती. तेव्हा बाळासाहेबांनी नारा दिला 'गर्व से कहो हम हिंदु है' जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते आज पूर्ण हौतं आहे. मोदींच्या नेतृत्वात पुढच्या वर्षी जानेवारीत राम मंदीरमध्ये मूर्तीची स्थापना होईल, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
उत्तर भारतीय लोकांचं संरक्षण करणं हे आमचं काम
पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीय लोकांचं संरक्षण करणं हे आमचं काम आणि कर्तव्य आहे. उत्तर प्रदेशमधून लोकं महाराष्ट्रात कामासाठी येतात. आपण या देशाचे नागरिक आहोत. आपण दिलेला धनुष्यबाण आम्ही महाराष्ट्रातून तो घराघरात पोहचवू, विकासाच गंगा पोहचवू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.