शनिवारी बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा पार पडली. या सभेतून मनोज जरांगे पाटील यांनी २० जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याची मोठी घोषणा केली. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आणखी एक अल्टिमेटम दिला असून अंतरवाली सराटीतून मुंबईकड निघेपर्यंत चर्चा करणार, त्यानंतर चर्चा बंद.. असे ते म्हणालेत. तसेच २० जानेवारीला चालत मुंबईकडे कूच करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
सरकारला इशारा...
बीडमधील (Beed) इशारा सभेतून जरांगे पाटील यांनी २० जानेवारीला मराठा आंदोलक मुंबईत धडकणार असल्याची घोषणा केली आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याचे जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी सांगितले आहे. तसेच "अंतरावलीमधून निघेपर्यंत सरकारशी चर्चा करु, मात्र अंतरवालीमधून मुंबईकडे निघाल्यानंतर चर्चा बंद..." असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.
३ कोटी मराठा बांधव मुंबईत धडकणार..
"२० जानेवारीला जरांगे पाटील चालत मुंबईकडे निघणार आहेत. २६ तारखेपर्यंत ते लाखो मराठा बांधवांसह मुंबईत पोहोचतील. या आंदोलनात १० लाख गाड्या सहभागी होणार असून तीन कोटी मराठा बांधव मुंबईला धडकणार आहेत, या उपोषणाच्या तयारीसाठीच सरकारला हा वेळ दिला असल्याचेही जरांगे पाटील म्हणालेत.
भुजबळांवर निशाणा..
यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर हल्लाबोल केला. यापुढे भुजबळांना महत्व देणार नसून ते आता बधीर झाली असल्याची टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. तसेच आता सरकारला कळेल की मराठे सोबत नसल्यावर किती सुपडा साफ होतो.. असा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावला. (Latest Marathi News)
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.