30 मेपासून जरांगेंचं पुन्हा आमरण उपोषण, 1994च्या धर्तीवर GR काढण्याची मागणी, जरांगेंच्या निशाण्य़ावर पुन्हा फडणवीस

Maratha Reservation Row Jarange Hunger Strike May-30: मराठा आरक्षणावरून राज्यात पुन्हा संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत. मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केलीये. आंदोलनाची घोषणा करताना जरांगेंच्या निशाण्यावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले आहेत. पाहूयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट...
https://www.youtube.com/watch?v=65wmp7SJ81s
https://www.youtube.com/watch?v=65wmp7SJ81ssaam tv
Published On

ऐकलंत... मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय. त्यामुळे यंदाही मराठा आरक्षणावरून सरकार आणि जरांगेंमध्ये संघर्ष पेटणार आहे. जरांगेंनी सरकारला आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिलीय. या मागण्या पूर्ण न झाल्यास जरांगे 30 मेपासून आपल्या अंतरवाली सराटी या गावातच आमरण उपोषण सुरू करणार आहेत. या आंदोलनाची घोषणा करताना त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय.

जरांगेंच्या प्रलंबित मागण्या काय आहेत ते पाहूयात...

मनोज जरांगेंच्या मागण्या-

हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्रांचं थांबवलेलं वाटप पुन्हा सुरू करा

कुणबी नोंदी सापडलेल्या 58 लाख मराठ्यांना 30 मे च्या आत प्रमाणपत्रं द्यावी

कुणबी प्रमाणपत्र दिलेल्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र द्या

1994च्या धर्तीवर सातारा, कोल्हापूर, पुणे संस्थान गॅझेटचा प्रलंबित GR काढा

उपसमिती बरखास्त करून मराठा-कुणबी मंत्रालय स्थापन करा

मराठा आरक्षणाची मागणी करत ऑगस्ट २०२३ मध्ये मनोज जरांगेंनी पहिल्यांदा अंतरवाली सराटीत आंदोलन पुकारलं होतं. त्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून जरांगेंचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मात्र दरवेळी त्यांच्यावर उपोषणाला बसण्याची वेळ येते. सरकार त्यांच्या मागण्या मान्य करतं. मात्र कधी कायद्याच्या कसोटीवर तर कधी प्रशासकीय दिरंगाईमुळे या मागण्या प्रलंबित राहतात. मात्र यावेळी तरी जरांगे उपोषणाला बसण्यापूर्वीच सरकार त्यांच्या मागण्या मान्य करणार की पुन्हा उपोषण सोडायलाच येणार याबाबत उत्सुकता लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com