
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आज मुंबईच्या दिशेने निघणार आहेत.
मोर्चाला फक्त जालना जिल्ह्याच्या हद्दीपर्यंतच परवानगी.
पोलिसांनी नोटीसा बजावून शांततेचे आवाहन केले.
४५० पेक्षा जास्त पोलिस कर्मचारी, एसआरपीएफ आणि ड्रोनसह तगडा बंदोबस्त.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे आज सकाळी १० वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. आंतरवाली सराटी ते मुंबई असा त्यांचा मोर्चा निघणार असून यामध्ये मोठ्यासंख्यने राज्यभरातल्या मराठी समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहेत. मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मुंबई हायकोर्टाने परवानगी नाकारली. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांना आणखी एक धक्का बसला आहे. मनोज जरांगे यांच्या मोर्चाला जालना जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत परवानगी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना पोलिसांनी मराठा आंदोलकांना नोटीसा पाठवल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाला जालना जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत अटी शर्तीसह परवानगी देण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६८ प्रमाणे मराठा आंदोलकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. वाहतूक नियम पाळण्यासह शांततेत मोर्चा करण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांनी दिल्या आहेत.
तसंच, मोर्चामध्ये आक्षेपार्ह घोषणा होणार नाही याची आंदोलकांनी काळजी घ्या, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं वर्तन करू नका, वाहतूक मार्गाचे पालन करा, न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना पोलिसांकडून मराठा आंदोलकांना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सकाळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. या पार्श्वभूमीवर जालना पोलिसांची तयारी देखील पूर्ण झाली असून जवळपास ४५० पोलिस कर्मचारी,अधिकारी मनोज जरांगे यांच्या मोर्चासाठी बंदोबस्तात तैनात असणार आहे. दोन एसआरपीएफच्या कंपन्यासह बॉम्ब शोधक पथक देखील असणार आहे. तर मनोज जारंगे पाटील यांच्या मोर्चावर पोलिसांच्या ड्रोनची नजर असणार आहे. दरम्यान मराठा आंदोलकांना पोलिसांनी शांततेच आवाहन केलं आहे.
६ उपविभागीय पोलिस अधिकारी
८ पोलिस निरीक्षक
४० सहाय्यक पोलिस निरीक्षक
२५० पोलिस कर्मचारी
२३० होमगार्ड
२ एसआरपीएफची कंपनी
३ आरएसपी प्लॅटुन बॉम्ब शोधक पथक आणि ड्रोन द्वारेनजर असणार
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.