Manoj Jarange on Voting: तुमची पसंती कोणाला? मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

Jalna Lok Sabha Election 2024 Voting News: मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमचं सर्वांनी वाटोळं केलंय, पण लोकशाहीचा हक्क बजावला पाहिजे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली.
Manoj Jarange on Voting: तुमची पसंती कोणाला? मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange's Reaction Before Casting Vote In Chhatrapati SambhajinagarSaam TV
Published On

रामनाथ ढाकणे, साम टीव्ही प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : देशासहित राज्यातील काही भागात आज शुक्रवारी दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडत आहे. दुसऱ्या टप्प्यात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार घराबाहेर पडत आहेत. मनोज जरांगे हे देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी छत्रपती संभाजी नगरहून जालन्यातील शहागडला रवाना झाले आहेत. मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमचं सर्वांनी वाटोळं केलंय, पण लोकशाहीचा हक्क बजावला पाहिजे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली.

Manoj Jarange on Voting: तुमची पसंती कोणाला? मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?
Nashik Lok Sabha: नाशिक लोकसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट, राष्ट्रवादीकडून दोन नव्या नावांचा प्रस्ताव; शिंदे गटात धाकधूक

छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे म्हणाले, 'अंतरवालीजवळ दोन ते तीन किलोमीटर अंतरावर मतदान केंद्र आहे. लोकशाहीचा हा मोठा उत्सव आहे. आपण मतदान केलं पाहिजे. माझं मराठा आणि महाराष्ट्रातील लोकांना आवाहन आहे की, सर्वांनी १०० टक्के मतदान करा. मतदान केलं पाहिजे. लोकशाहीच्या उत्सवासाठी मतदान केलं पाहिजे'.

'आम्हाला खूप विरोध झाला. आम्ही सहा ते सात महिने आंदोलन केलं. आम्हाला सुखाने काही दिलेलं नाही. यासाठी शेकडो तरुणांचं बलीदान गेलेले आहेत. अनेक मराठा समाजाचे लोक रस्त्यावर उतरले. मराठा समाजाच्या महिला देखील रस्त्यावर उतरल्या. त्यावेळी आम्हाला त्रास झाला. त्यामुळे या निवडणुकीत ज्याला पाडायचं, त्याला पाडा, असे ते म्हणाले.

Manoj Jarange on Voting: तुमची पसंती कोणाला? मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?
Maval Lok Sabha : मावळ लोकसभा मतदार संघात तिरंगी लढत; वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज

'मी या निवडणुकीत नाही. समाजाच्या हातात निवडणूक आहे. आम्ही एकही पक्ष उभा केलेला नाही. तुम्हाला ज्याला पाडायचं असेल त्याला पाडा. पण सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी , मराठा आणि कुणबी एकच आहे, असं म्हणणाऱ्यांना मदत करा. यावेळी मत वाया घालवू नका. मराठ्यांच्या एकीची भीती, पण मराठ्यांच्या मताची भीती नाही? त्यांना मराठांच्या मताची भीती वाटली पाहिजे. इतक्या ताकदीने पाडा की, त्यांच्या दोन-तीन पिढ्या निवडणुकीत उभे राहणार नाहीत. एकजुटीने मत करा, असेही आवाहन त्यांनी केलं.

'आपलेही म्हणतील आम्हाला मतदान करा. कोणीच कोणाचं नाही. महाविकास आघाडी आणि महायुती सारखेच आहे. असं ताकदीने पाडा की, तुमच्या मताची किंमत कळाली पाहिजे. कोणालाही पाडा. यांनी आरक्षण नाही दिलं तर ४ जूनपासून बाजी लावणार आहे. ६ जूनपर्यंत आरक्षण न दिल्यास मी ८ जूनपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहे, अशी घोषणा जरांगे यांनी यावेळी केली.

तुमची पसंती कोणाला, या प्रश्नावर जरांगे म्हणाले, सर्वांनी वाटोळं केलं आहे. पण लोकाशाहीचा हक्क आहे. त्यामुळे हक्क बजावणार आहे. त्यामुळे मतदानाला चाललो आहे. मी पुन्हा आंदोलन करणार आहे. शरीर साथ देत नाही. तरी चेहऱ्यावर दाखवत नाही. मरायला भीत नाही. समाजाने काळजी करू नये. मी खंबीर आहे. आशीर्वाद आणि साथ द्या'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com