Manoj Jarange Patil: हिंदूंना आडवण्याचा प्रयत्न का? देवदेवतांना पुढे केले जातंय? मुंबईकडे निघण्याआधी मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Maratha Morcha: मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने कूच करण्यापूर्वी सर्व मराठा बांधवांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. 'हिंदूंना आडवण्याचा प्रयत्न का?', असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.
Manoj Jarange Patil: हिंदूंना आडवण्याचा प्रयत्न का? देवदेवतांना पुढे केले जातंय? मुंबईकडे निघण्याआधी मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange PatilSaam Tv
Published On

Summary -

  • मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने मोर्चा काढणार आहेत.

  • मनोज जरांगेंनी मुंबईकडे निघण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली.

  • मुंबईकडे निघण्यापूर्वी शांततेत लढाईचे आवाहन त्यांनी मराठा बांधवांना केले.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर धार्मिक आडवणुकीचा आरोप त्यांनी केल

  • मोदी-शहा यांना थेट प्रश्न उपस्थित करत सरकारवर हल्लाबोल.

मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला. ते १० वाजता आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. मुंबईला निघण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांशी संवाद साधला आणि ही लढाई आपल्याला शांततेत लढायची असल्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी 'हिंदूंना आडवण्याचा प्रयत्न का? देवदेवतांना पुढे केले जातंय?', असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने कूच करण्यापूर्वी सर्वांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, 'आता थांबायचे नाही. शांततेत मुंबईकडे निघायचे. समाजाची मान खाली होईल असे एकानीही वागायचे नाही. आपल्याला भडकावण्याचा प्रयत्न केला जाईल. पण आपण शांत डोक्याने जायचे. आता आरपारची शेवटची लढाई लढायची. यानंतर तक धरून लढाई जिंकू शकतो. अशी लढाई जगाच्या पाठिवर कधी झाली नसेल इतक्या शांत डोक्याने ही लढाई जिंकायची आहे. कितीही दिवस लागले तर हा शांततेचा संघर्ष सुरू ठेवायचा.'

Manoj Jarange Patil: हिंदूंना आडवण्याचा प्रयत्न का? देवदेवतांना पुढे केले जातंय? मुंबईकडे निघण्याआधी मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil: आज मराठ्यांचा मोर्चा मुंबईकडे रवाना होणार! मनोज जरांगे पाटील सकाळी १० वाजता निघणार

जरांगेंनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, 'देव-देवताच्या नावाखाली आपली, आडवणूक केली जात आहे. त्रास दिला जातोय. आम्ही हिंदू असून आम्हाला रोखलं जाते. गणपती उत्सव, महादेव सर्व देवांची पूजा करतो. ज्यांना हिंदुत्वाची, देवाचं देणंघेणं नाही. ते आम्हाला आडवता. आम्ही पिढ्यापरंरपरेने सेवा करतो. पण हिंदू देवाच्या नावाखाली आमचीच आडवणूक का? याचे उत्तर मोदी शाह यांनी द्यावे.'

Manoj Jarange Patil: हिंदूंना आडवण्याचा प्रयत्न का? देवदेवतांना पुढे केले जातंय? मुंबईकडे निघण्याआधी मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil: संतोष भैय्याला न्याय द्या, नाहीतर एका दिवसात राज्य बंद पाडू; जरांगे पाटील यांचा इशारा

'सणाच्या दिवशी सरकारला राज्यात अशांतता पसरवायची आहे. मुख्यमंत्र्यांकडून जाणूनबाजून आम्ही शांततेत येत असताना आम्हाला त्रास का दिला जातोय? तुम्ही यासाठी त्यांना बसवले आहे का?', असा सवाल मनोज जरांगे यांनी पीएम मोदी यांना केला आहे. तसंच, 'हिंदू सणाच्या दिवशी हिंदूलाच आडवले. मग हिंदूच्याविरोधात कोण? आम्ही काय दंगली करायला निघालोय का? मग आम्हाला का आडवता? तुम्ही हिंदूविरोधी काम का करायला लागलात? याचेही उत्तर हवे आहे.', असे जरांगे म्हणाले.

Manoj Jarange Patil: हिंदूंना आडवण्याचा प्रयत्न का? देवदेवतांना पुढे केले जातंय? मुंबईकडे निघण्याआधी मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Manoj Jarage Patil: मनोज जरांगेंचं मिशन विधानसभा, पुण्यातील सर्व मतदारसंघाचा अहवाल मागवला; कुणाला मिळणार तिकीट?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com