
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज बीडमधील मस्साजोगला जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. आरोपींना लवकारत लवकर पकडा, असं सांगत जरांगेंनी सरकारला इशारा दिलाय. 'मुख्यमंत्री साहेब तुम्ही न्याय द्या, ही आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो'. पण तुम्ही पुन्हा पुन्हा दगाफटका कराल, तर संयम सुटू शकतो.
तुम्ही आरोपी सापडत नाहीत म्हणता मग राज्य तुम्हीच तर बिघडवत नाहीत ना, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य बंद पडण्याचा इशारा दिलाय. मनोज जरांगे पाटील यांनी आज परभणी आणि बीडच्या दौऱ्यावर होते. त्यांनी परभणी येते सोमनथा सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी बीडला जात संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिलाय.
देशमुख प्रकरणात आपण न्याय घेतल्याशिवाय शांत राहणार नाहीत. मुख्यमंत्री आपल्याला न्याय देतील असा विश्वास करताना त्यांनी फडणवीस यांना इशारादेखील दिलाय. परत परत दगाफटका कराल तर संयम सुटू शकतो, न्याय मिळाला नाही तर एका दिवसात राज्य बंद पाडू असं जरांगे पाटील यावेळी म्हणालेत.
२८ तारखेला बीडला मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये जनतेने मोठ्या संख्येने यावे असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. वैभवी देशमुख हिने देखील आवाहन केलंय. त्यामुळं तो शब्द अंतिम शब्द म्हणून आपण सर्वांनी यायचं. तो शब्द राजकारणात तोलायचा नाही. कोणत्या नेत्याने देखील म्हणायचं नाही आम्हाला बोलावलं नाही.
आपल्या लेकीच्या दुखासाठी सर्वांनी यायचं. कोणी म्हणायचं नाही अमक्याने ठेवलाय मोर्चा म्हणून करू नका. सर्वांनी येथे यावे. प्रत्येक माणूस म्हणतोय आपल्या संतोष भैय्याला आपल्याला न्याय द्यायचा आहे. एका लेकीने हाक मारलीय त्यामुळं सर्वांनी मोर्चात या. समोर कोण आणि मागे कोण हे डोक्यात ठेऊ नका असं जरांगे पाटील म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.