Manoj Jarange : आमचा घात केला आता सुट्टी नाही, मनोज जरांगे पाटलांचा इशारा

Manoj Jarange Patil News : विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करायचे की पाडायचे याबाबत मनोज जरांगे आज अंतिम निर्णय घेणार आहेत.
Manoj Jarange
Manoj Jarange PatilSaam Digital
Published On

Manoj Jarange Patil News : आमचा आनंद हिरावून घेणाऱ्यांना सुट्टी नाही. आमच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. पण आम्ही आमच्या लक्षाचा वेध घेणार आहोत. आम्हाला संपवणाऱ्यांना संपवणार म्हणजे संपवणार, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला. ते अंतरवाली सराटी येथे बोलत होते. आमच्यावर सूडबुद्धीने वार केला आणि आमचा घात केला, असा आरोपही यावेळी जरांगे पाटील यांनी केला.

मनोज जरांगे राजकीय हत्यार उपसणार असल्याचं समोर आलेय. विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करायचे की पाडायचे याबाबत मनोज जरांगे आज अंतिम निर्णय घेणार आहेत. आज समाजाशी चर्चा करून आपला अंतिम निर्णय ते जाहीर करणार आहेत.

ओबीसींच्या काही जातींना आरक्षण दिलं. पण आमच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. आमचा आनंद हिरावून घेणाऱ्यांना आता सुट्टी नाही. सरकारला आता सुट्टी नाही. आमच्यावर सुडबुद्धीने वार केला, आमचा घात केला. आमच्या आनंदात विष कालवले, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

आम्हाला संपवायला निघालेल्यांना संपवणार, असा इशारा यावेळी जरांगेंनी दिला.

Manoj Jarange
Maharashtra Politics : शरद पवारांना सोडायचा प्रश्न येत नाही, वळसे पाटलांचे मोठं वक्तव्य, VIDEO

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

70 वर्षांपासून आरक्षण दिले नाही.

राजकारण लोकांचं नाव काढलं की राह येतो.

आमचं ठरलेय आहे. आम्ही अमच्या लक्षाचा वेध घेतला.

आम्हाला संपवायला निघालेल्या आम्ही संपविणार, प्रक्रिया कोणतीही असो.

आमच्या हाता तोंडाला आलेले आरक्षणाचा घास काढून घेतला.

सरकार ला, देवेंद्र फडणवीस यांना कुठलाही अधिकार नसताना आमचं हक्क हिस्कावल.

आम्हाला आमचे लेकरं बाळ बघायचे आहे. आम्ही आमच्या भविष्याचे बघतो.

आमचं लक्ष आमचे लेकरं मोठ करणे आहे.

राजकारणी लोकांचं नाव काढलं तरी राग येत आहे.

यांनी समाजाची मन दुखावले, याच हिशोबच होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com