जात पडताळणी समित्य़ा रद्द करा, जरांगेंनी पुन्हा एकदा रणशिंग फुकलं!

Maratha Reservation Stir Intensifies as Manoj Jarange: आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगेंनी पुन्हा एकदा पक्का निर्धार करत आमरण उपोषण पुकारलंय. यावेळी त्यांनी जात पडताळणी समितीवरूनही आक्रमक भूमिका घेतलीय.. जरांगे नेमकं काय म्हणाले? पाहूयात या रिपोर्टमधून...
Manoj Jarange Patil Hunger Strike Over Maratha Reservation; Demand To Scrap Caste Verification Committees
Manoj Jarange Patil Hunger Strike Over Maratha Reservation; Demand To Scrap Caste Verification Committeessaam tv
Published On

मराठा आरक्षण आणि कुणबी नोंदींच्या अंमलबजावणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय... अंतरवाली सराटीत आरक्षणाच्या लढ्यासाठी जरांगे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसलेत... मात्र यावेळी जरांगेंनी आपली रणनिती बदलत एक नवी मागणी सरकारपुढे ठेवलीय... देशात जात पडताळणीची कोणतीही गरज नसून यासंदर्भातील समिती रद्द केली पाहिजे, असं स्पष्ट मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलंय...

दुसरीकडे जरांगेंच्या या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलचं तापलयं... जात पडताळणी समिती रद्द केली तर अनुसुचित जाती-जमातीचं प्रमाणपत्र कोणीही मिळवेल,अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळांनी दिलीय...

मुळात देशातील अनेक राज्यात आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी किंवा इतर कामांसाठी केवळ सक्षम प्राधिकारी असणारे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी - SDO यांनी दिलेले जात प्रमाणपत्र पुरेसे मानले जाते. त्यामुळे कोणत्या राज्यात जात पडताळणी समिती नाही पाहूयात...

गुजरात

कर्नाटक

मध्य प्रदेश

उत्तर प्रदेश

तामिळनाडू

या राज्यांमध्ये महाराष्ट्रासारखी वेगळी जात पडताळणी समिती नाही...

गेल्या तीन वर्षांत जरांगेंनी सरकारविरोधात 11 उपोषणं केली... मात्र तरीही जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य झालेल्या नाहीत...आरक्षणाच्या या लढ्यात जरांगे पाटलांनी आता थेट प्रशासकीय यंत्रणेला आणि जात पडताळणीच्या प्रक्रियेलाच आव्हान दिलयं...त्यामुळे राज्य सरकार जरांगेंची ही नवी मागणी मान्य करणार की नाही? जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं यासाठी सरकार नेमकी कोणती भूमिका घेणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com