मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने 30 दिवसांची मुदत मागितली होती. मात्र, 42 दिवस उलटून गेले सरकारने आरक्षण दिले नाही. त्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून त्यांची प्रकृती खालवत चालली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान, डॉक्टरांचं एक पथक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या तपासणीसाठी अंतरवाली सराटी गावात गेलं होतं. या पथकाला जरांगे पाटील यांनी हाकलून लावलं आहे. तुम्हाला इथे कुणी बोलावलं, तातडीने इथून निघून जा. असं म्हणत जरांगे पाटील तपासणीला आलेल्या डॉक्टरांवर संतापल्याचं पाहायला मिळालं.
मराठा आरक्षण (Maratha Aarkshan) हाच माझा उपचार आहे. सरकारने आरक्षण जाहीर करावं, तेव्हाच मी उपचार घेईन, असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मराठा बांधवांनी पाठिंबा दिला आहे. अनेक गावातील गावकऱ्यांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मराठा बांधवांना आवाहन केलं आहे. कुणीही आरक्षणासाठी आत्महत्या करु नये, असे जरांगे पाटील म्हणाले आहेत. मराठा आंदोलकांनी आंदोलन गांभीर्याने घ्यावे. मी राज्य सरकारला शेवटचं सांगतो त्यांनी मराठा बांधवांना तातडीने आरक्षण द्यावे. उद्या २९ पासून आमरण उपोषण सुरु करा, असं त्यांनी म्हटलं आहे.
आंदोलकांनी वयोमर्यादेचा अंदाज घेऊन उपोषण करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी करा. संपूर्ण गावांनी एकजुटीने बसावं, सरकारवर दबाव निर्माण कराव. आपल्या गावात किंवा दारात कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला येऊ देऊ नका तुम्ही देखील जाऊ नका, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.