Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंची 'शांतता रॅली' आज जालन्यात! होम ग्राऊंडवर होणार जल्लोषात स्वागत; शहरात तगडा पोलीस बंदोबस्त

Manoj Jarange Patil Rally Jalna: आज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात जालन्यात शांतता रॅली निघणार आहे. या शांतता रॅलीच्या मार्गावर विविध समाज बांधवांकडून मनोज जारंगे पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे.
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंची शांतता रॅली आज जालन्यात! होम ग्राऊंडवर होणार जल्लोषात स्वागत; शहरात तगडा पोलीस बंदोबस्त
Manoj Jarange Patil Rally Jalna:Saamtv
Published On

अक्षय शिंदे, ता. १२ जुलै २०२४

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज जालन्यामध्ये निघणार आहे. या शांतता रॅलीच्या मार्गावर विविध समाज बांधवांकडून मनोज जारंगे पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. या रॅलीची मराठा बांधवांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंची शांतता रॅली आज जालन्यात! होम ग्राऊंडवर होणार जल्लोषात स्वागत; शहरात तगडा पोलीस बंदोबस्त
Arvind Kejriwal Bail: ब्रेकिंग! CM अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन; पण मुक्काम जेलमध्येच

शांतता रॅली आज जालन्यात

आज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात जालन्यात शांतता रॅली निघणार आहे. या शांतता रॅलीच्या मार्गावर विविध समाज बांधवांकडून मनोज जारंगे पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात होणार असून याच ठिकाणी जय भीम सेनेच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत होणार आहे..

काल बीडनंतर अंतरवाली सराटी येथे मुक्कामी असलेले मनोज जरांगे हे अकरा वाजता जालना शहरांमध्ये दाखल होतील. त्यानंतर जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळा चौकातून या रॅलीला सुरुवात होणार आहे. यासाठी आयोजकांकडून तयारी करण्यात आली असून रॅली दरम्यान तीन ठिकाणी मनोज जरांगे यांचे जेसीबी आणि मोठ्या फुलांचे हार घालून त्यांचं स्वागत होणार आहे.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंची शांतता रॅली आज जालन्यात! होम ग्राऊंडवर होणार जल्लोषात स्वागत; शहरात तगडा पोलीस बंदोबस्त
Maharashtra Politics: लातूरमध्ये भाजपला धक्का! माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा शरद पवार गटात प्रवेश; दादांच्या आमदाराला आव्हान देणार?

शहरात तगडा बंदोबस्त

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर जालन्यामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शांतता रॅलीसाठी 400 पोलीस तैनात करण्यात आले असून रॅली मार्गावर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली जाणार आहे. हजारो झेंडे आणि शेकडो बॅनर्समुळे शहर भगवामय झाले असून लाखोच्या संख्येने मराठा बांधव रॅलीमध्ये सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंची शांतता रॅली आज जालन्यात! होम ग्राऊंडवर होणार जल्लोषात स्वागत; शहरात तगडा पोलीस बंदोबस्त
Ahmednagar Accident: हृदयद्रावक! भरधाव डंपरच्या धडकेत पती ठार, पत्नी गंभीर जखमी; ७ महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com