Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा मार्ग मोकळा! पोलिसांकडून आंदोलनाची परवानगी, काय आहेत अटी-शर्ती?

Manoj Jarange Patil Agitation: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनासाठी परवानगी मिळाली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावी यासाठी आंदोलन करत आहेत.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSaam Tv
Published On
Summary
  • मराठा आंदोलनासाठी परवानगी मिळालीय.

  • मनोज जरांगे पाटील यांना एक दिवस आंदोलन करण्याची परवानगी मिळाली आहे.

  • ५ हजार आंदोलनकर्त्यांसोबत आझाद मैदानावर आंदोलन करता येईल.

  • शनिवार आणि रविवारी आंदोलनासाठी परवानगी नसेल.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत., परंतु मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलनाची परवानगी नाकारली होती. आता हाती आलेल्या माहितीनुसार जरांगे यांना एका दिवसांच्या आंदोलनाची परवानगी देण्यात आलीय. काही अटी शतींसह परवानगी देण्यात आलीय.

मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आंदोलनासाठी फक्त ५ हजार लोकांना सोबत ठेवता येणार आहे. तसेच शनिवारी-रविवारी आंदोलन करता येणार नाहीये. एक दिवासाची परवानगी मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. सरकार जर एका दिवसात मागण्या मान्य करत असेल तर आम्ही एका दिवसात आंदोलन संपवू असं जरांगे-पाटील म्हणालेत.

२९ ऑगस्ट रोजी सकाळी १०:०० वाजता आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी विनंती अर्ज करण्यात केला होता. त्यानंतर पोलिसांनी काही अटी शर्तीसह आंदोलनास परवानगी दिलीय.

काय आहेत अटी- शर्ती

ऑगस्ट २६ २०२५/भाद्रपद ४, शके १९४७, असाधारण क्रमांक ४५, प्रधिकृत प्रकाशन अन्वये जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका (अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग मुंबई यांच्या अधिकार क्षेत्रात) नियम २०२५ नुसार आंदोलकांना सार्वजनिक सभा, संमेलने, मोर्चे, आंदोलने, निदर्शने, धरणे, मेळावे, मिरवणुका इत्यादीसाठी आझाद मैदान (राखीव भाग), निश्चित करण्यात आलाय. नमुद नियमावलीमध्ये आझाद मैदान या ठिकाणाची निश्चिती रहिवाशांना, रहदारीला, कमीत-कमी अडथळा होण्याचे आणि विनियमित केलेल्या रीतीने निदर्शकांसाठी पुरेशी जागा उपलब्ध होण्याचे तत्व विचारात घेवून करण्यात आले आहे.

१) नियम क. ४ (६) (च) नमुद आंदोलनास एका वेळी फक्त एका दिवसासाठी परवानगी देण्यात येईल. शनिवार, रविवार व शासकीय किंवा सार्वजनिक सु‌ट्टीच्या दिवशी कोणत्याही परवानग्या देण्यात येणार नाहीत.

२) नियम क. ५ नुसार ठराविक वाहनांना परवानगी देण्यात आलेली असून वाहनतळासाठी वाहतूक पोलीसांशी विचारविनिमय करुन परवानगी देण्यात येईल. आपली वाहने मुंबईत प्रवेश केल्यानंतर ईस्टर्न फ्री वे या रस्त्याने वाडीबंदर जंक्शनपर्यंत येतील. त्यापुढे मुख्य आंदोलकासोबत फक्त ५ वाहने आझाद मैदान येथे जातील. इतर सर्व वाहने ही वाडीबंदर येथून पोलीसांनी निर्देशित केलेल्या शिवडी, ए शेड व कॉटनग्रीन परिसरात थेट नियोजित ठिकाणी पार्कीग करीता नेण्यात यावीत.

Manoj Jarange Patil
Eknath Shinde: शिवसेनेच्या नेत्यांना मनोज जरांगेंवर बोलण्यास मनाई; गुप्त बैठकीत एकनाथ शिंदेंचा मंत्र्यांना आदेश

३) नियम क. ६ मध्ये आंदोलकांची कमाल संख्या पाच हजार ही पाळणे बंधनकारक आहे. तसेच आझाद मैदानाचे ७००० स्कवेअर मीटर एवढेच क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. असून त्याची क्षमता ५००० पर्यंत आंदोलकांना सामावून घेण्याएवढीच आहे. परंतु तेथे प्रचंड मोठ्या संख्येने आंदोलक आल्यास त्यांना थांबण्यासाठी मैदानात पर्याप्त जागा उपलब्ध होणार नाही. तसेच आपले अर्जापूर्वी इतर आंदोलकांनी सुध्दा दिनांक २९/८/२०२५ रोजी आंदोलनासाठी परवानगी मागितलेली आहे.

त्यांचा आंदोलनाचा हक्क सुद्धाबाधित करता येणार नाहीत. त्यामुळे ५००० आंदोलकांमध्ये त्यांचा सुध्दा समावेश असेल. त्यामुळे त्या आंदोलकांना मैदानातील पुरेशी जागा उपलब्ध करुन देणे बंधनकारक असेल.

४) नियम क. ७ मध्ये नमूद असल्याप्रमाणे विनिर्देशित केलेल्या क्षेत्राच्या दिशेने आणि क्षेत्राकडून मोर्चा नेला जाणार नाही.

५) नियम क. ८ मध्ये नमूद असल्याप्रमाणे परवानगी घेतल्याशिवाय ध्वनीक्षेपक, सार्वजनिक प्रचार यंत्रणा किंवा गोंगाट करणारी उपकरणे यांचा वापर करता येणार नाही.

६) नियम क. १० मधील आंदोलनाची वेळ सकाळी ९.००. ते सायंकाळी ६.०० याच वेळेसाठी दिलेली असून त्यानंतर आंदोलकांना मैदानात थांबता येणार नाही.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील थोडक्यात बचावले; पहिल्या मजल्यावरून लिफ्ट थेट जमिनीवर आदळली

७) नियम क. ११ (ज) नुसार सहभागी व्यक्ती ही विनिर्देशित क्षेत्रात कोणतेही अन्न शिजवणार नाहीत किंवा केर-कचरा टाकणार नाहीत असे महत्त्वाचे नियम असून इतर सुध्दा नियम नमुद केलेले आहेत.

८) नियम क. ४ (ग) मध्ये आम्हांस असलेल्या अधिकारान्वये आपणांस सूचित करण्यात येत आहे की, आपले आंदोलनाचे कालावधी दरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव हा सण मोठया प्रमाणात साजरा होत आहे, त्यानुसार गणेश विर्सजनदरम्यान रहदारीस कोणताही अडथळा किंवा नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.

धार्मिक भावना दुखावणार नाहीत याप्रकारचे आपणाकडून किंवा आपले आंदोलकाकडून असे कृत्य होणार नाही. तसेच आपले आंदोलन कार्यक्रमात लहान मुले, गरोदर स्त्रिया व वृध्द व्यक्तींना सहभागी केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com