Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील थोडक्यात बचावले; पहिल्या मजल्यावरून लिफ्ट थेट जमिनीवर आदळली

Manoj Jarange Patil Lift Accident in Beed : बीडमधील एका रुग्णालयाची लिफ्टचा मोठा अपघात घडलाय. पहिल्या मजल्यावरून लिफ्ट थेट जमिनीवर कोसळली. या लिफ्टमध्ये मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरंगे पाटील होते, ते थोडक्यात बचावले.
Manoj Jarange Patil Lift Accident in Beed
Manoj Jarange Patil and his aides rescued after lift falls at Shivajirao Critical Care Hospital in BeedSaam tv
Published On
Summary
  • मनोज जरांगे पाटील यांना बीडमधील हॉस्पिटलमध्ये लिफ्ट अपघाताचा सामना करावा लागला.

  • लिफ्टमध्ये बिघाड होऊन ती थेट जमिनीवर कोसळली.

  • सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झाली नाही.

  • लिफ्टचे दरवाजे तोडून सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

योगेश काशिद, साम प्रतिनिधी

मनोज जरांगे पाटील हे लिफ्टच्या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. बीड शहरातील एका हॉस्पीटलमध्ये हा अपघात घडला. शिवाजीराव क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगे पाटील एका रुग्णाला भेटण्यासाठी जात होते. जरांगे पाटील लिफ्टच्या साहाय्याने रुग्ण असलेल्या मजल्यावर जात होते. पण लिफ्टमध्ये बिघाड झाल्यानं लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळली. सुदैवानं या अपघातामध्ये कोणालाही मोठी दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. लिफ्टचे दरवाजे तोडून जरांगे पाटलांसह सहकाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहे.

Manoj Jarange Patil Lift Accident in Beed
Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा दे धक्का! मुंबईतील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

जरांगे-पाटील हे शिवाजीराव क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये अॅडमीट असलेल्या एका रुग्णाला भेटण्यासाठी आले होते. रुग्ण असलेल्या मजल्यावर ते लिफ्टच्या साहाय्यानं जात होते. त्याचवेळी लिफ्टमध्ये बिघाड झाला, आणि लिफ्ट जमिनीवर आदळली. या लिफ्टचे दरवाजे तोडून जरांगे पाटील यांच्यासह त्यांचे सहकाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे अनेकांचा जीव भांड्यात पडला. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत.

Manoj Jarange Patil Lift Accident in Beed
Beed Crime : बीडमध्ये गुंडाराज! बैल शेतात गेला म्हणून शेतकरी महिलेला अमानुष मारहाण, जाब विचारणाऱ्या भावांनाही चोपलं; Video

जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करणार आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर ते याच महिन्यात आंदोलन करणार आहेत. सरकार आरक्षणाचा निर्णय देत तोपर्यंत मुंबईतील आंदोलन बंद करायचं नाही, असा निर्धार त्यांनी केलाय. दरम्यान ते आज बीडमधील शिवाजीराव क्रिटीकल केअर हॉस्पीटलमध्ये आले होते, तेथे त्यांच्यासोबत हा अपघात घडला.

Q

मनोज जरांगे पाटील कोण आहेत?

A

मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी मराठा आरक्षणासाठी तीव्र आंदोलन केलं आहे.

Q

मनोज जरांगे पाटील कोणत्या मागण्यांसाठी आंदोलन केलं?

A

मराठा समाजाला OBC आरक्षण मिळावं, या मुख्य मागणीसाठी त्यांनी उपोषण, मोर्चे व पदयात्रा यासारख्या शांततापूर्ण आंदोलनाचं नेतृत्व केलं.

Q

मनोज जरांगे पाटील कोणत्या भागातून येतात?

A

मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील अंढाळनेर या गावचे रहिवासी आहेत.

Q

मनोज जरांगे पाटील सध्या कशामुळे चर्चेत आलेत?

A

बीडमधील हॉस्पिटलमधील लिफ्ट अपघातामुळे ते अलीकडे चर्चेत आले, ज्यात ते थोडक्यात बचावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com