ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगेंचा गनिमी कावा; सरकारला फुटणार घाम

Maratha Reservation Protest: मराठ्यांच्या मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत तीन दिवसांपासून जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसलेत. यावेळची लढाई ही शेवटची असल्याचं सांगत जरांगेंनी मराठ्यांना 'चलो मुंबई'चा नारा दिलाय... मुंबईत आंदोलनासाठी जरांगेंनी काय रणनीती आखलीय ? पाहा या स्पेशल रिपोर्टमधून...
Manoj Jarange Patil’s Chalo Mumbai Strategy
Manoj Jarange Patil’s Chalo Mumbai Strategysaam tv
Published On

अंतरवाली सराटीत सुरु असलेल्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जरांगेंनी केलेली ही घोषणा....काहीही झाली तरी मुंबई घुसणारचं, असं विधान करत जरांगेंनी सरकारला पुन्हा एकदा आव्हान दिलयं...जरांगेंनी मराठ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी आणि अवैध ठरवलेले कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारला 28 ऑगस्टपर्यंतचा एल्टिमेटम दिला होता... मात्र शिष्टमंडळासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानं अखेर जरांगे अंतरवालीत उपोषणाला बसले... त्यामुळे मुंबईत आंदोलन होणार नाही, अशी चर्चा असताना जरांगेंनी मराठ्यांना काय आवाहन केलयं..ऐका...

एकीकडे मुंबई जाण्याचा प्लॅन जरांगेंनी आखला असली तरी सरकार मराठ्यांना रोखण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मराठ्यांच्याही आता लक्षात आलंय... त्यामुळे यावेळी जरांगेंचा काय गनिमी कावा आहे ते पाहूयात...

ऐन गणेशोत्सवात जरांगेंचा गनिमी कावा

- 12 सप्टेंबरपर्यंत मुंबईत जमा

- मराठे मुंबईत आल्याचं कुणालाही समजायला नको

- मुंबईत गेल्यावर मित्राकडे किंवा पाहुण्याकडे राहा

- आझाद मैदान किंवा वर्षा बंगल्याकडे कुणीही जाऊ नका

- पोलिसांनी अडवलं, पोलीस ठाण्यात नेलं तर घाबरू नका

- पोलिसांना कोणताही त्रास देऊ नका

दुसरीकडे जरांगे पाटलांनी थेट मुंबईला चाल करून जाण्याचा इशारा दिल्यानंतर मराठे आक्रमक झालेत. 6 सप्टेंबरपासून विविध मार्गांनी आणि गनिमी कावा करून मुंबईत पोहोचण्याची तयारी मराठा बांधवांनी दर्शवलीय. जरांगेंनी मराठ्यांच्या मागण्यांसाठी आता निर्णायक लढा देण्याची इशारा दिलाय...यावेळी सर्व मागण्या मान्य केल्याशिवाय जरांगे माघार घेण्याची शक्यता फार कमी आहे. ऑगस्ट 2025 मध्ये मराठ्यांचं वादळ जेव्हा मुंबईत धडकलं तेव्हा मंत्र्यांसह राज्य सरकारला जरांगेंनी कसं जेरीस आणलं हे सर्वांनीच पाहिलयं... त्यामुळे सरकारला तोडगा काढण्यात अपयश आलं आणि आंदोलन चिघळलं तर मुंबईत पुन्हा मोठा गोंधळ उडण्याची भीती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com