Manoj Jarange Patil : २३ तारखेला 'दूध का दूध, पानी का पानी' होईल; मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Manoj Jarange Patil News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची घोषणा केलीये. यावर विरोधी पक्षाकडून आचारसंहिता लागणार असल्याने विशेष अधिवेशन कसं बोलवणार
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSaam TV
Published On

लक्ष्मण सोळुंके

Maratha Aaraskhan:

आज पासून मनोज जरांगे पाटील आपल्या पाचव्या टप्यातील दौऱ्याला सुरवात करत आहेत. या दौऱ्यानिमित्त त्यांनी बोलताना मराठा समाजाला जो संघर्ष करावा लागत आहे तो कुठं तरी थाबला पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी भावना व्यक्त केलीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj Jarange Patil
Maratha Reservation News : मराठा आरक्षणावरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची घोषणा केलीये. यावर विरोधी पक्षाकडून आचारसंहिता लागणार असल्याने विशेष अधिवेशन कसं बोलवणार असा प्रश्न उपस्थित केलाय. त्यावर देखील मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत निवडणुका तर झाल्या पाहिजे ना? त्यामुळे आचासंहिता लागणार कशी? असा सवाल उपस्थित केलाय.

२४ डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळणारच, असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्री यांच्यावर समाजाने विश्वास टाकला त्यांच्या शब्दाचा सन्मान केला अत्ता त्यांनी समाजाचा सन्मान करावा. त्यांनी काल आरक्षणाचा विषय पटलावर मांडला त्यात एक दोन शब्द ते विसरले त्या बाबद ही ते स्पष्ट करतील, असं जरांगे पाटील म्हणाले.

सरकार सरकारचं काम करत आहे. आम्ही आमचं काम सुरूच ठेवलं आहे. मागचे अनुभव आणि घोषणा पाहता आम्ही उड्या मारणार नाही. जे चांगलं असेल त्याला चांगलं म्हणू जे न पटणारं असेल त्याला विरोध करू. त्यामुळे सरकार आणि मुख्यमंत्री काय मंडतात त्याचा निर्णय २४ तारखेनंतर होणार आहे. त्यामुळे २४ तारखेला दूध का दूध पानी का पानी होणारच असल्याचा उशारा, मनोज पाटील जरांने यांनी सरकारला दिला आहे.

Manoj Jarange Patil
Yavatmal Crime News : यवतमाळला जावयाचा प्रताप; पत्नीसह सास-याला अन् मेहुण्याला संपवलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com