Exclusive : जे आरक्षण लिहून देणार नाहीत त्यांना पाडा, मनोज जरांगे काय म्हणाले?

Manjo Jarange Interview: विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सामन टीव्हीवर मुलाखत दिली.
Exclusive : जे आरक्षण लिहून देणार नाहीत त्यांना पाडा, मनोज जरांगे काय म्हणाले?
Manoj Jarange Patil
Published On

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज, सोमवार शेवटचा दिवस आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी मराठा बांधवांना उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या सूचनाही केल्या. याच भूमिकेचा कानोसा घेण्यासाठी सकाळ समूहाचे संपादक निलेश खरे यांनी मनोज जरांगे यांच्याशी बातचीत केली. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आपली पुढील दिशा सांगितली. त्याशिवाय जे आरक्षण लिहून देणार नाहीत, त्यांना पाडा असा संदेशही मराठा समाजाला दिला.

मराठा आरक्षण, महाराष्ट्राच्या राजकारणातील कळीचा मुद्दा. याच मुद्द्यावर मनोज जरांगे गेले अनेक महिने आंदोलन करत आहेत. हेच आंदोलन राजकारणात रुपांतर होईल, असे चित्र तयार झाले होते. त्यातून महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघेल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस, त्याचवेळी मनोज जरांगे यांनी आपण राजकीय उमेदवार उभे कऱणार नाही, ही निवडणूक लढणार नाही, असे जाहीर करत माघार घेतले. मनोज जरांगेंनी ही माघार का घेतली? कुणी निरोप दिला? याबाबात मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले मनोज जरांगे पाटील पाहूयात...

Exclusive : जे आरक्षण लिहून देणार नाहीत त्यांना पाडा, मनोज जरांगे काय म्हणाले?
Chhagan Bhujbal: जरांगेंची निवडणुकीतून माघार, छगन भुजबळांची दोन वाक्यात प्रतिक्रिया,विषय संपवला!

उमेदवारांना पाडण्याच्या भूमिकेवर काय म्हणाले जरांगे?

जे उमेदवार मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून देतील. त्या पूर्ण करतील असं जे निवडून देतील त्यांनाच मराठा समाज निवडून देणार असल्याचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं. मग दोन्ही उमेदवारांनी आमच्या मागण्या समजून घेतल्या नाहीत, तेव्हा आम्ही तिसर्या उमेदवाराला निवडून आणू असंही जरांगे म्हणालेत. त्यामुळे उमेदवारांकडून मागणी मान्य करून घेण्याचं लिहून घेतल्यानंतरच मराठा समाज मतदान करेल असं ते म्हणालेत.

आरक्षणावर काय म्हणाले?

राज्यकर्त्यांनी जनतेला आपलं मानलं तर सर्वांच्या मागण्या मान्य होतात. मग त्या मराठा असो किंवा मुस्लीम समाजाच्या मागण्या असो. कायदा आणि संविधान मानलं तर सर्वांनाच आरक्षण मिळू शकतं. आरक्षण देण्यासाठी फक्त इच्छाशक्ती असणं आवश्यक असते. आचारसंहिता लागण्याआधी सरकारने १६ ते १७ जातींचा समावेश ओबीसीमध्ये केला. त्यामुळे इच्छाशक्ती लागते. मनात दुसऱ्या समाजाविषयी वाईट नसले पाहिजे. द्वेष नसला पाहिजे.

Exclusive : जे आरक्षण लिहून देणार नाहीत त्यांना पाडा, मनोज जरांगे काय म्हणाले?
Laxman Hake vs Jarange: मनोज जरांगे नावाचे वटवाघूळ महाराष्ट्राच्या मानेवर बसलंय; लक्ष्मण हाकेंची घणाघाती टीका

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com