मनोज जरांगेंच्या बॉम्बनंतर शिवसेना आक्रमक; CM नंतर आता थेट PM मोदींकडे केली मोठी मागणी

Manoj Jarange Audio Controversy: मनोज जरांगे पाटील यांनी या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्यातील वरिष्ठ नेतृत्वाने लक्ष घालावे, असे आवाहन केलंय. उपमुख्यमंत्री शिंदेंवर आरोप होत असल्यानं शिवसेना नेत्यानं थेट मोदींना पत्र लिहिलंय.
Manoj Jarange Audio Clip Row: Shiv Sena Demands Investigation
Manoj Jarange Audio Clip Row: Shiv Sena Demands Investigationsaam tv
Published On: 
Summary
  • मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा कथित कट असल्याचा दावा

  • ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू

  • या प्रकरणात पंतप्रधान मोदी आणि राज्यातील वरिष्ठ नेतृत्वाने लक्ष घालावे, असे आवाहन जरांगेंनी केलंय.

मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी केलेल्या ५०० कोटींच्या आरोपानंतर ऑडिओ क्लिप सादर केल्याने खळबळ उडालीय. या ऑडिओ क्लिपमध्ये मनोज जरांगे यांचे आंदोलन कसे बदनाम करायचे याचा कट आखण्यात आला. त्यासाठी पाचशे कोटी रुपये देण्यात आल्याचा उल्लेख असल्याने आता महायुतीतील भाजपा आणि शिंदे शिवसेना यांच्यात एकमेकांविषयीचा कलगीतुरा लागलाय.

या दरम्यान आता या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेची तपासणी करण्याची मागणी शिवसेने नेत्यांकडून केली जातेय. शिवसेनेच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत एसआयटीद्वारे चौकशी करण्याची मागणी केलीय. त्यानंतर आता ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी थेट पंतप्रधान, अमित शाह , मोहन भागवत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित चौकशी करण्याची मागणी केलीय.

मराठा आंदोलन आणि आपल्याला बदनाम करण्यासाठी कसे षडयंत्र रचले होते असा आरोप मनोज जरांगेंनी केलाय. ऑडिओ क्लिप सादर करत आपण पाचशे कोटींचा आरोप उगाच करत नव्हतो, असं जरांगे ऑडिओ क्लिप प्रासरित करताना म्हणाले. त्यानंतर शिंदे गटाकडून त्याला उत्तर दिलं जातंय.या ऑडिओ क्लिपमध्ये श्रीकांत शिंदे यांचा काही संबंध नाही, हे केवळ भांडण लावण्यासाठी केल्याचा आरोप शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी केला.

तसेच शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी यात सर्व भाजपचे नेते आहेत, एकही आमचा नेता नाही असे म्हटलंय. यावर भाजपचे नेते आशीष शेलार यांनी मैदानात उतरुन या ऑडिओ क्लिपचा भाजपाशी काही संबंध नाही, याची तपासणी व्हावी असं म्हटलंय. तर भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी एआयच्या जमान्यात काहीही करता येते असं म्हटलंय.

दरम्यान शिंदे गटाच्या नेत्यांनी आज 'वर्षा' बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने एक पत्र दिले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविषयी एका महिलेने केलेल्या वक्तव्यामागे त्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे षडयंत्र आहे का? त्या महिलेची पार्श्वभूमी आणि पुराव्यांची सखोल चौकशीची करण्यात यावी. ऑडिओ क्लिपमध्ये भाजप नेते आमदार निरंजन डावखरे आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या नावांचा उल्लेख आहे, त्यामुळे असा काही प्रकार घडला होता का याबाबत त्यांच्याकडेही विचारणा व्हावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आलीय.

Manoj Jarange Audio Clip Row: Shiv Sena Demands Investigation
500 कोटींचा आरोप, जरांगेंचा ऑडिओ बॉम्ब; मराठा आंदोलन मोडून काढण्याचा कट कुणाचा?

शिवसेनेच्या या शिष्टमंडळात विधान परिषद उपसभापती सचिन अहिर, खासदार मिलिंद देवरा, खासदार रवींद्र वायकर, माजी खासदार राहुल शेवाळे आणि माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आता कथित ऑडिओ क्लिपची एसआयटी स्थापन करून चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणामागे काही नियोजित कटकारस्थान आहे का, राजकीय हेतूने संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झालाय. राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कुणाचा डाव आहे का, असा संशय व्यक्त करण्यात येतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com