Manmad Union Bank Scam: युनियन बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट, चाळीसगावमधून एकाला अटक

Manmad Police: संदीप देशमुख असं संशयित आरोपीचे नाव असून हे घोटाळा प्रकरण समोर येताच तो फरार झाला होता. आता याप्रकरणात पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याला चाळीसगावमधून अटक करण्यात आली.
Manmad Union Bank Scam: युनियन बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट, चाळीसगावमधून एकाला अटक
Manmad Bank ScamSaam Tv

अजय सोनावणे, मनमाड

मनमाड शहरातील (Manmad City) युनियन बँकेच्या (Union Bank) शहर शाखेमध्ये घोटाळा झाला आहे. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी मनमाड पोलिसांनी चाळीसगावातून (Chalisgaon) एकाला अटक केली आहे. संदीप देशमुख असं संशयित आरोपीचे नाव असून हे घोटाळा प्रकरण समोर येताच तो फरार झाला होता. आता याप्रकरणात पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. युनियन बँकेच्या मनमाड शहर शाखेत फिक्स डिपॉजिट खातेदारांचे कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा संदीप देशमुखवर आरोप आहे.

मनमाड शहरातील युनियन बँकेत घोटाळा झाल्याचे प्रकरण समोर येताच खातेदारांनी बँकेत मोठी गर्दी केली आहे. आपल्या बचत खात्यातून पैसे काढण्यासाठी गुंतवणुकदार आणि खातेदारांनी बँकेमध्ये गर्दी करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे बँकेच्या बाहेर गोंधळाचे वातावरण आहे. गर्दी झाल्याने कोणालाच आत सोडले जात नसल्याने बँकेच्या बाहेर सध्या गोंधळाचे वातावरण आहे. बँकेबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Manmad Union Bank Scam: युनियन बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट, चाळीसगावमधून एकाला अटक
IT Raid In Nashik: नाशिकमध्ये सराफा व्यापाऱ्यांच्या अडचणी वाढल्या; प्रसिद्ध ज्वेलर्सच्या दुकांनावर IT अधिकाऱ्यांच्या धाडी

दोन दिवसांपूर्वी बँकेच्या अधिकृत प्रतिनिधीने बनावट शिक्के आणि सर्टिफिकेट देऊन गुंतवणुकदारांच्या 1 कोटीपेक्षा जास्त रक्कमेचा अपहार केला असल्याचे प्रकरण समोर आले. संदीप देशमुख असे विमा काढून देणाऱ्या अधिकाऱ्यांचे नाव आहे. बँकेत अपहार झाल्याच्या वृतामुळे खातदेरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे खातेदारांनी बँकेत पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी केली.

Manmad Union Bank Scam: युनियन बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट, चाळीसगावमधून एकाला अटक
Nashik Crime: शनि शिंगणापूरमधून पंचवटीमधील पाच जणांना अटक; भद्रकाली पोलिसांची कारवाई

हे घोटाळा प्रकरण समोर आल्यानंतर संदीप देशमुख हा संशयित आरोपी फरार झाला होता. त्याला शोधण्यासाठी मनमाड पोलिसांनी पथक तयार केले होते. पोलिसांच्या या पथकाला संशयित आरोपी संदीप देशमुखला अटक करण्यात यश आले. चाळीसगावमधून संदीप देशमुखला अटक करण्यात आली आहे. त्याला मनमाडला आणले जाणार असून पोलिस त्याची कसून चौकशी करणार आहेत. या प्रकरणात आणखी कोण-कोण सहभागी आहेत का? या सर्व बाजूने तपास केला जाणार आहे.

Manmad Union Bank Scam: युनियन बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट, चाळीसगावमधून एकाला अटक
Manmad News : बँक प्रतिनिधीकडून १ कोटींचा अपहार; रक्कम काढण्यासाठी खातेदारांची बँकेत गर्दी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com