IT Raid In Nashik: नाशिकमध्ये सराफा व्यापाऱ्यांच्या अडचणी वाढल्या; प्रसिद्ध ज्वेलर्सवर IT अधिकाऱ्यांच्या धाडी

Income Tax Raids On Bullion Traders: नाशिक शहरामध्ये आयकर विभागाने सराफा व्यावसायिकांवर छापे टाकले आहेत. सोने चांदीच्या दागिन्यांच्या व्यवहारांबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
IT Raid In Nashik: नाशिकमध्ये सराफा व्यापाऱ्यांच्या अडचणी वाढल्या; प्रसिद्ध ज्वेलर्सवर  IT अधिकाऱ्यांच्या धाडी
IT Raid In NashikSaam Tv

तबरेज शेख, साम टीव्ही नाशिक

नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. नाशिक शहरात सराफा व्यावसायिकांवर आयकर विभाग आज पहाटेपासून छापे टाकत आहे. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागातील सुरणा ज्वेलर्स तसेच त्यांच्या निवासस्थानावर आणि इतर ठिकाणी अधिकाऱ्यांची तपासणी सुरू आहे. आज पहाटेपासून ही कारवाई सुरू असल्याची माहिती मिळत आहेत. आयकर विभाग नाशिक शहरातील सराफ व्यावसायिकांवर छापे टाकत आहेत.

तब्बल ३९ वाहनांमध्ये आयकर विभागाचे अधिकारी आल्याची माहिती मिळत आहे. पहाटेपासून अधिकारी कार्यरत आहे. नाशिकमध्ये आयकर विभागाची ही एक मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे. अधिकृत सोने चांदी खरेदी आणि दागिन्यांच्या व्यवहाराबाबत हवाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याप्रकरणी आयकर विभाग आजची कारवाई करत (Gold Silver Shop IT Raid) आहेत.

नाशिकमधील काही सराफ व्यावसायिकांवर आयकर विभागाच्या धाडी पडत (Income Tax Raid) आहेत. आयकर विभागाकडून सराफा व्यापाऱ्यांची दुकानं तसंच घरांची तपासणी सुरू आहे. सराफ व्यावसायिकांनी व्यवहारांची माहिती लपवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आयकर विभागाच्या दोन पथकांकडून शहरातील सराफ व्यावसायिकांची चौकशी सुरू (Income Tax Raids On Bullion Traders) असल्याची माहिती मिळतेय. नाशिक शहरात सराफा व्यापारी पिढीवर इन्कम टॅक्सचे छापे आज पडत आहे.

IT Raid In Nashik: नाशिकमध्ये सराफा व्यापाऱ्यांच्या अडचणी वाढल्या; प्रसिद्ध ज्वेलर्सवर  IT अधिकाऱ्यांच्या धाडी
NIA Raid: ब्रेकिंग! एनआयएकडून देशभरात ११ ठिकाणी छापेमारी; रामेश्वरम कॅफे प्रकरणात कारवाई

मागील काही महिन्यात राज्यात आयकर विभागामार्फत विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. आजच्या आयकर विभागाच्या धाडीमुळे नाशिक शहरातील सराफा व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली (IT Raid In Nashik) आहे. त्यांच्याकडून व्यवहारांबाबत माहिती लपवली जात असल्याचा संशय आयकर विभागाकडून व्यक्त होत आहे. फक्त दुकानंच नाही तर घरांवर देखील आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. आता या कारवाईत पुढे काय होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

IT Raid In Nashik: नाशिकमध्ये सराफा व्यापाऱ्यांच्या अडचणी वाढल्या; प्रसिद्ध ज्वेलर्सवर  IT अधिकाऱ्यांच्या धाडी
IT Raid Agra: चप्पल व्यापाऱ्याच्या घरी छापा, नोटांचा ढीग पाहून अधिकारी चक्रावले, पैसे मोजून मोजून दमले; ३० कोटी जप्त

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com