विनोद जिरे
बीड : आपल्या बायकोच्या सख्ख्या भावाने, मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याने व सतत कुटुंबातील व्यक्तींना त्रास देत असल्यानं, नात्याने दाजी असणाऱ्या 30 वर्षीय तरुणांने मित्राच्या सोबतीने बायकोच्या सख्ख्या भावाचा खून करत काटा काढला आहे. तर हा खून केल्यानंतर अपघात झाल्याचा बनाव आरोपींनी केला होता. Man killed his wife's brother with the help of friends
मात्र नेकनूर पोलीस ठाण्याचे एपीआय लक्ष्मण केंद्रे यांच्या सतर्कतेने, हा खुणाचा गुन्हा अवघ्या 24 तासात उघडकीस आणला आहे. तर नात्याने दाजी असणाऱ्या आरोपी मनोज अंकुश घोडके (वय 30) रा.घोडका राजुरी, राजाभाऊ ज्ञानदेव यादव (वय 21)रा. वांगी आणि कृष्णा गोपीनाथ डाके (वय 27) रा. काठोडा या तिघांना अटक केली आहे.
हे देखील पहा-
बीडच्या Beed मांजरसुंबा Manjarsumba घाटात, मंगळवारी सकाळी बुलेटवर 25 वर्षीय निलेश ढास या तरुणाचा अपघात झाल्याचे दिसून आले होते. तर मृत निलेश ढास हा सोमवारी दवाखान्यात मामाला भेटण्यासाठी गेलेला होता. पण मंगळवारी सकाळी मांजरसुंबा घाटात मयत अवस्थेत आढळला होता. म्हणजेच बुलेटचा अपघात झाल्याचे भासविण्यात आले होते. Man killed his wife's brother with the help of friends
मात्र घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर हा प्रकार खुनाचा प्रकार असल्याचे नेकनूर पोलिस स्टेशनचे एपीआय लक्ष्मण केंद्रे यांनी ओळखले. त्यांनी तातडीने तपासाला गती देत, यातील मुख्य आरोपी तथा मयत युवकाचा सख्खा दाजी तथा मामाचा मुलगा मनोज अंकुश घोडके याला पोलिसांनी अंत्यविधी होताच ताब्यात घेतले.
त्यानंतर आज यातील उर्वरित आरोपी राजाभाऊ ज्ञानदेव यादव (वय 21) राहणार वांगी, कृष्णा गोपीनाथ डाके (वय 27) राहणार काठोडा यांना अटक करण्यात आली आहे. एपीआय लक्ष्मण केंद्रे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी 24 तासात या गुन्ह्याची उकल केली आहे. दरम्यान खुन का केला ? याची माहिती देत तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
Edited By-Sanika Gade
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.