वटपौर्णिमेला पतीच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करणाऱ्या पत्नीचाच खून !

वटसावित्री पौर्णिमेच्या रात्रीच पतीच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे मागणी करणाऱ्या पत्नीलाच चारित्र्याच्या संशयावरून पतीने धारदार शस्त्राने वार करून जीवे ठार मारल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.
वटपौर्णिमेला पतीच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करणाऱ्या पत्नीचाच धारदार शस्त्राने खून !
वटपौर्णिमेला पतीच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करणाऱ्या पत्नीचाच धारदार शस्त्राने खून !भूषण अहिरे
Published On

भूषण अहिरे

धुळे : धुळ्यातून Dhule मन सुन्न करून टाकणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वटसावित्री पौर्णिमेच्या रात्रीच पतीच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे मागणी करणाऱ्या पत्नीलाच चारित्र्याच्या संशयावरून पतीने धारदार शस्त्राने Weapon वार करून जीवे ठार मारल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. Man killed his wife with a sharp weapon

दर्शना योगेश धनगर या विवाहितेस पति योगेश धनगर याने चारित्र्याच्या संशयावरून धारदार शस्त्राने वार करून वडसावित्री पौर्णिमेच्या रात्रीच जीवे ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दर्शना व योगेश यांच्या लग्नाला अवघे सहा वर्ष पूर्ण झाले आहेत. यांना पाच व तीन वर्षांची असे दोन मुलं देखील आहेत.

हे देखील पहा -

योगेश हा दर्शनावर नेहमीच चारित्र्याचा संशय घेऊन तिला मारहाण करीत असे. परंतु वटसावित्री पौर्णिमेच्या रात्री या दोघांमध्ये झालेला वाद हा टोकाला गेला आणि योगेश ने दर्शनाच्या डोक्यात, खांद्याला व मानेला धारदार शस्त्राने सपासप वार करून तिला जिवे ठार मारले.

वटपौर्णिमेला पतीच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करणाऱ्या पत्नीचाच धारदार शस्त्राने खून !
Windows 11 मध्ये 6 वर्षानंतर नवे अपडेट, युजर्सला मिळणार 'खास' फीचर्स

याबाबत आज सकाळी शेजारच्यांनी दर्शनाच्या बहिणीस फोन करून झालेल्या घटनेबाबत माहिती दिल्यानंतर ही बाब उघडकीस आली. या संदर्भात थाळनेर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती कळविल्यानंतर पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दर्शनाचा मृतदेह ताब्यात घेतला. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी हा पाठविण्यात आला आहे.

तसेच जीवे ठार मारणाऱ्या पतीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधामध्ये कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मन सुन्न करून टाकणाऱ्या या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण शिरपूर तालुक्यासह धुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com