माणूस आणि कावळ्याची जिवाभावाची मैत्री; ९ वर्षांचा हृदयस्पर्शी किस्सा

Real Story Of Man And Crow Friendship In satara: साताऱ्यातील भीमराव दरेकर आणि एका कावळ्याची तब्बल ९ वर्षांची मैत्री सध्या चर्चेत आहे. अंधश्रद्धा मोडणारी आणि माणुसकीचा संदेश देणारी ही हृदयस्पर्शी कथा नक्की वाचा.
“A rare and heartwarming moment as a crow sits affectionately on a man’s head, showcasing a 9-year-old friendship beyond words.”
“A rare and heartwarming moment as a crow sits affectionately on a man’s head, showcasing a 9-year-old friendship beyond words.”Saam tv
Published On

कावळा अपशकुनी म्हणून अनेक त्याला बघून नाक मुरडतात. कधी कावळ्याचा स्पर्श झाला म्हणून काही अंगावर पाणी शिंपडून घेतात. मात्र आज कावळ्यासोबत असलेल्या मैत्रीचा असा किस्सा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.. की ते पाहिल्यानंतर तुम्हालाही अश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही... चला तर पाहुया नेमकी ही दोस्ती आहे तरी कशी

ही दुस्ती तुटायची नाय... अन् डोक्यावर बसून खाल्या शिवाय समाधान नाय.... दुस्ती यारीच्या लय झ्याल झ्याल गप्पा तुम्ही ऐकल्या असत्याल... पण ही दुस्ती जरा निराळी हाय... ही माणूस अन् माणसाची नाय तर माणूस अन् कावळ्याची हाय... ती बी नऊ वर्ष जुनी... ऐकुन उडली ना डोसक्यातली पाखरं

तर ही हाईत भीमराव दरेकर आमचं लाडकं तात्या मु पोस्ट सावर्डे तालुका जावळी जिल्हा सातारा... यांचं गावात हाय किराणा दुकान... गोळ्या बिस्किटापासनं ती गव्ह तांदळा पर्यंत सगळं यांच्या दुकानात एकदम all in one .... तांबड फुटायला तात्या त्यांच दुकानात उघडत्यात... पण दुकान उघडायच्या आधीपासनं पत्र्यावर बसून वाट बघतू ती त्यांचा दोस्त कावळोबा...

तात्यानं दुकान उघडलं का पट्ट्या दुकानात समोर हजर.... गडी काव काव करुन तात्याला बलवील . तात्या दिसना का पट्ट्या थेट एखाद्या पोक्त्या माणसावानी दुकानात शिरल. जवर तात्या बाहेर येत नाय तवर वाघाला दम नाय... तात्या एकदाचं बाहेर दिसलं का काळीज थंड झालं म्हणून समजा.

मग तात्यानं त्याला आंजारायचं गोंजारायचं ... खांद्यावर नाय तर डोक्यावर घियायचं... पोटच्या लेकरावाणी वाघाला हातानं फरसाणा भरवायचा... अन् कावळे शेटनं चट दिशी संपवायचा... असा ह्यो तात्याचा मैतर... मागच्या नव वर्षापासनं कावळोबाची हावा हाय.. तात्या अन् कावळोबाची दोस्ती आजूबाजुच्या गावात वर्ल्ड फेमस... दोघांची ही दोस्ती लोकं थांबू था़ंबून बघत्यात अन् कौतुक करत्यात

खरं तर आज माणूस माणसाची वळख ठेवणा... पण मुक जनावर आपल्या दोस्ताला बरोबर लक्षात ठेवतंय... कावळ्याला तर माणसानं अपशकूनी ठरवलंय ... पण कावळ्यानं प्रेम दिऊन माणसालाच जवळ केलंय...आता तुम्हीच ठरवा माणसानं शिकायचं काय? प्रेमानं मन जिंकायची का? द्वेषानं सगळं गमवायचं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com