
१७ वर्षांनंतर मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल जाहीर.
सर्व ७ आरोपी निर्दोष मुक्त, पुराव्यांचा अभाव.
साध्वी प्रज्ञा यांची दुचाकी असल्याचा कोणताही स्पष्ट पुरावा नाही.
एनआयए आणि एटीएसच्या तपासातील अनेक त्रुटींवर न्यायालयाने बोट ठेवले.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना तब्बल १७ वर्षांनंतर निर्दोष मुक्त करण्यात आलं. मुंबईतील एनआयए विशेष न्यायालयात आज या खटल्याचा निकाल जाहीर करण्यात आला. 'संशय हा पुराव्याचा आधार होऊ शकत नाही,' असं स्पष्ट करत न्यायालयाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यासह सातही आरोपींना निर्दोष मुक्त केलं. तसेच, स्फोटासाठी वापरलेली दुचाकी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या मालकीची असल्याचा कोणताही ठोस पुरावा नसल्याचंही न्यायालयाने स्पष्ट केलं.
दरम्यान, २९ सप्टेंबर २००८ मालेगावात नेमकं काय घडलं होतं? बॉम्बस्फोट नेमका कसा घडला होता? जाणून घेऊयात थोडक्यात.
मालेगाव बॉम्ब ब्लास्ट - १७ वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं?
२९ सप्टेंबर २००८ रोजी रमजान महिन्यात मालेगावमध्ये झालेल्या स्फोटात ६ जणांचा मृत्यू, तर १०० हून अधिक जण जखमी झाले होते.
मशिदीजवळ पार्क केलेल्या दुचाकीत स्फोट झाला.
भाजप नेत्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर, सुधाकर चतुर्वेदी यांच्यावर आरोप.
१९ एप्रिल २०२४ रोजी सुनावणी पूर्ण; न्यायालयाने निकाल राखून ठेवला.
आरोपींना योग्य शिक्षा देण्याची NIAची मागणी.
३१ जुलै २०२५ रोजी न्यायालयाचा अंतिम निकाल जाहीर.
स्फोट घडवण्यामागे मुस्लिम समाजात भीती पसरवून सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याचा कट - NIA चे आरोप.
संपूर्ण गटाचा स्फोटात प्रत्यक्ष सहभाग असल्याचं पुराव्यानिशी स्पष्ट होत असल्याचं NIAचं म्हणणं.
तपासाची सुरुवात ATS ने केली; २०२२ मध्ये एनआयएकडे हस्तांतरण.
७ आरोपींवर आरोप निश्चित केल्यानंतर २०१८ साली प्रत्यक्ष सुनावलीला सुरूवात.
आरोपींवर UAPA कायद्याच्या दहशतवादी कृती आणि कट रचण्याचे आरोप. यासह भारतीय दंड संहितेच्या हत्या, हत्येचा प्रयत्न, धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप.
सुरूवातीला सरकारी पक्षानं ३२३ साक्षीदार तपासले, त्यातील ३७ फितूर झाले.
स्फोटक ठेवलेली दुचाकी साध्वी प्रज्ञाची होती, असा ATS चा दावा.
२३ ऑक्टोबर २००८ साली साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरला अटक. त्यानंतर १४ नोव्हेंबरपर्यंत ११ जणांना बेड्या.
या प्रकरणी ATS नं MCOCA लावला होता. पण नंतर ते मागे घेण्यात आले.
2008 च्या सुरुवातीलाच कट रचला गेला, फरीदाबाद, भोपाळ, नाशिक येथे बैठक. ATSचा दावा.
RDX चा वापर, जम्मू-काश्मीरमध्ये मिळवले.
बॉम्ब चतुर्वेदीच्या घरी बनवण्यात आला, नंतर दुचाकीवर बसवण्यात आले.
रामजी कालसंग्रा, संदीप डांगे - फरार.
प्रज्ञा ठाकूर यांच्या मालकीची दुचाकी रामजी कालसंग्राच्या ताब्यात होती, असा एनआयएचा दावा.
'या प्रकरणात मला गोवण्यात येत आहे.'- साध्वी प्रज्ञात सिंह ठाकूर यांचा दावा.
'आपल्याविरुद्ध कोणताही पुरावा नाही' - कर्नल पुरोहित.
मकोका हटवल्यानंतर, मकोका अंतर्गत घेतलेल्या जबाबांची किंमत शुन्य.
ATSच्या तपासात दोष असल्याचा दावा. NIAनं नव्यानं काही जबाब नोंदवले. काही साक्षीदारांनी साक्ष बदलली.
एनआयएने एकदा प्रज्ञा यांना आरोपींची यादीतून वगळण्याची मागणी केली होती, पण विशेष न्यायालयाने नाकारले.
आज मालेगाव स्फोटप्रकरणी न्यायालयानं निकाल दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.