ओंकार कदम | सातारा प्रतिनिधी | साम टीव्ही मराठी
BJP Rajabhau Barge joins Eknath Shinde Shiv Sena Satara : एकनाथ शिंदेंनी साताऱ्यात भाजपला जोरदार धक्का दिला आहे. कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचे विश्वासू म्हणून साताऱ्यात ओळख असलेले राजाभाऊ बर्गे यांनी शिवसेनेचा झेंडा हातात घेतला आहे. एकनाथ शिंदे आज साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत, यावेळी राजाभाऊ बर्गे यांनी शेकडो कार्याकर्त्यांसोबत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. २०२९ च्या निवडणुकीची तयारी शिवसेनेकडून सुरू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत अनेकांचा प्रवेश होत आहे. साताऱ्यातही शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग झाली आहे.
साताऱ्यातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांना एकनाथ शिंदेंनी राजकीय धक्का दिला आहे. महेश शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी साथ सोडली. बर्गे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशावेळी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे आणि शिवसेनेचे सातारा जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज सातारा जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला.यामध्ये आमदार महेश शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांचाही समावेश होता. बर्गे यांनी भाजपची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यामुळे आमदार महेश शिंदे यांना हा खूप मोठा झटका मानला जातोय. बर्गे यांच्या प्रवेशामुळे साताऱ्यात शिंदेंच्या शिवसेनेची जोरदार ताकद वाढली आहे.
महेश शिंदे हे जरी शिवसेनेत असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत कोरेगाव विधानसभा मतदार संघात भाजपचे काम केल्याचे वारंवार पाहायला मिळत होते.महेश शिंदे यांच्या पत्नी डॉक्टर प्रिया शिंदे यादेखील भाजपच्या तिकिटावरच खटाव या जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आल्या आणि जिल्हा परिषदेमध्ये सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून विराजमान झाल्या. त्यामुळेच एका बाजूला महेश शिंदे यांची भाजपशी जवळीक वाढत असतानाच आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या जाहीर सभेमध्ये कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी शिवसेनेमध्ये केलेल्या या प्रवेशामुळे महेश शिंदेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.