Maharashtra Politics: सांगलीत राष्ट्रवादीचा बुरूज ढासळला, जयंत पाटलांचे विश्वासू भाजपात; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती घेतलं 'कमळ'

Annasaheb Dange Joins BJP: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. अण्णासाहेब डांगे यांनी घरवापसी केली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
Maharashtra Politics: सांगलीत राष्ट्रवादीचा बुरूज ढासळला, जयंत पाटलांचे विश्वासू भाजपात; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती घेतलं 'कमळ'
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On

सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. जयंत पाटील यांचे जवळचे विश्वासू यांनी पक्षाची साथ सोडत भाजपचे कमळ हाती घेतले. सांगलीतील माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी घरवापसी केली. मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अण्णासाहेब यांच्यासोबत त्यांची दोन्ही मुलं चिमण डांगे आणि विश्वनाथ डांगे यांनी देखील भाजपचे कमळ हाती घेतले.

काही दिवसांपूर्वी अण्णासाहेब डांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. अखेर त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी सांगलीमध्ये राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं असल्याचं म्हटलं जात आहे. तर सांगलीमध्ये भाजपची ताकद चांगलीच वाढली आहे.

Maharashtra Politics: सांगलीत राष्ट्रवादीचा बुरूज ढासळला, जयंत पाटलांचे विश्वासू भाजपात; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती घेतलं 'कमळ'
Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार

अण्णासाहेब डांगे हे सांगलीमधील भाजपाचे पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ नेते आणि धनगर समाजाचे नेते आहेत. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ, जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भारतीय जनता पक्षात काम केलेले आहे. राज्यात पहिल्यांदा काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यात अण्णासाहेब डांगे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ते शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये ग्रामविकास आणि पाणीपुरवठा मंत्री होते. २००२ मध्ये पक्षांतर्गत वादातून त्यांनी भाजपला रामराम ठोकला आणि स्वत:चा स्वतंत्र राजकीय पक्ष सुरू केला. पण त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Maharashtra Politics: सांगलीत राष्ट्रवादीचा बुरूज ढासळला, जयंत पाटलांचे विश्वासू भाजपात; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती घेतलं 'कमळ'
Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर अण्णासाहेब डांगे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चा खऱ्या ठरल्या. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत ते स्वगृही परतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी अण्णासाहेब डांगे यांची दोन्ही मुलं विश्वनाथ आणि चिमण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी अण्णासाहेब डांगे यांच्या कार्यकर्त्यांनी देखील भाजपचे कमळ हाती घेतले.

Maharashtra Politics: सांगलीत राष्ट्रवादीचा बुरूज ढासळला, जयंत पाटलांचे विश्वासू भाजपात; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती घेतलं 'कमळ'
Maharashtra Politics: रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदमांनी घेतली अनिल परबांची भेट, राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com