शिवसेनेत बंड झालं आणि शिंदेसेना निर्माण झाली त्याला चार वर्षंही पूर्ण होत नाहीत... तोच शिंदेसेनेतही बंडाची पहिली ठिणगी पडलीय... आणि ती सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं होम पिच असलेल्या साताऱ्यात....एकनाथ शिंदेंच्या सातारा दौऱ्याच्या वेळीच शिंदेसेनेतील वाद चव्हाट्यावर आलाय.. पर्यटन मंत्री शंभुराज देसाई आपल्याला डावलत असल्याचा आरोप करत आणि भाजपचं कौतूक करत महेश शिंदेंनी बंडाचं निशाण फडकवलंय...तर शिदेंना आव्हान देणारे मातीमोल होतात, असं म्हणत उदय सामंतांनी महेश शिंदेंना प्रत्युत्तर दिलंय...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सातारा दौऱ्याबाबत पालकमंत्र्यांनी आपल्याला ं निमंत्रणच तर नाहीच पण साधा फोनसुद्धा केला नाही... असा आरोप महेश शिंदेंनी केलाय.. हे कमी होतं की काय... कार्यक्रमाच्या ठिकाणी लावलेल्या बॅनरवरुनही महेश शिंदेंचा फोटो गायब झालाय..
खरं तर या वादाला किनार आहे ती सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील वादाची.... महेश शिंदेंच्या पत्नी प्रिया शिंदे यांना भाजपनं गनिमी कावा करत सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बसवलं... मात्र यावेळी पोलीस आणि पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्यात राडा झाला.. मंत्री देसाईंना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला.. त्याचे विधीमंडळातही पडसाद उमटले.... त्यावेळी महेश शिंदे पक्ष सोडून भाजपसोबत उभे राहिले एवढंच नाही तर नगरपालिका निवडणुकीत महेश शिंदे यांचे प्रतिस्पर्धी शशिकांत शिंदेंनी 'शिंदे आणि सातारा' कनेक्शन सांगत जवळकीचे संकेत दिले
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदेसेनेनं महेश शिंदेंच्या पत्नीला विरोध केल्यानं महेश शिंदे नाराज आहेत.. त्यातच शिंदेंच्या दौऱ्यातील बॅनरवरुनही डावलल्यानं महेश शिंदेंच्या जखमेवर मीठ चोळलं गेलंय... त्यामुळे अपमानाची भळभळती जखम घेऊन महेश शिंदे कोंडमारा होत असतानाही आमदारकीची टर्म पूर्ण होईपर्यंत शिंदेसेनेत राहणार की अपमानापेक्षा कुठलंही पद मोठं नाही, असं म्हणत आपला मूळ पक्ष भाजपमध्ये प्रवेश करणार... याकडे राज्याचं लक्ष लागलंय..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.