Buldhana : पालकमंत्री मराठा असल्याची लाज वाटते ,महेश डोंगरेंचा संताप; जिजाऊ जन्मोत्सवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष..

Mahesh Dongre statement : राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Buldhana
BuldhanaSAAM TV
Published On

संजय जाधव, साम प्रतिनिधी बुलढाणा

राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप करत मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “पालकमंत्री मराठा समाजाचे असूनही त्यांना याची लाज वाटली पाहिजे,” असे परखड वक्तव्य त्यांनी केले.

Buldhana
Beed Politics: मोठी बातमी! बीडमध्ये नवं राजकीय समीकरण, राष्ट्रवादी- शिवसेनेची MIM सोबत युती

डोंगरे यांनी सांगितले की, जिजाऊ जन्मोत्सवाच्या आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाने अद्याप एकही बैठक घेतलेली नाही. त्यामुळे 12 जानेवारी रोजी सिंदखेडराजा येथे येणाऱ्या लाखो जिजाऊ भक्तांसाठी कोणतीही तयारी नसल्याने भाविकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. पाणी, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य सुविधा, सुरक्षा यासारख्या मूलभूत सोयींचे कोणतेही नियोजन नसल्याचा आरोप त्यांनी केला.

सिंदखेडराजा येथील राष्ट्रमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान असलेला राजवाडा सध्या भकास अवस्थेत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या या स्थळाकडे शासनाने कायमच दुर्लक्ष केले असून त्याचा विकास फक्त कागदावरच असल्याचा आरोप त्यांनी केला.

Buldhana
Maharashtra Politics: भाजपाची अवस्था पिंजरा चित्रपटातल्या मास्तरासारखी, राष्ट्रवादीच्या नेत्याची सडकून टीका

या सर्व बाबींविरोधात मराठा क्रांती मोर्चा राज्यभर आंदोलन उभारणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. जर शासनाने तात्काळ दखल घेतली नाही, तर जिजाऊ जन्मोत्सवाच्या दिवशी आणि त्यानंतरही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असे महेश डोंगरे यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, भाविक, इतिहासप्रेमी आणि विविध सामाजिक संघटनांनीही शासनाने तातडीने हस्तक्षेप करून सिंदखेडराजा येथील सुविधा वाढवाव्यात व जिजाऊ जन्मोत्सवाचे शासकीय स्तरावर नियोजन करावे, अशी मागणी केली आहे. आता या प्रकरणात शासन व प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com