
भरत मोहळकर-
महायुतीला मिळालेलं यश ईव्हीएममुळं मिळाल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीने केलाय. तर पवारांच्या राष्ट्रवादीने ईव्हीएमच्या हॅकिंगसाठी ईस्त्राईली तंत्रज्ञान वापरल्याचा आरोप केलाय. यावेळी पवारांच्या पक्षाने ऑडिओ क्लिप ऐकवून दाखवलीय. या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आहे? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बंपर यश मिळालं. मात्र भाजप आणि महायुतीला मिळालेला विजय हा ईव्हीएम सेट करून विजय मिळाल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय.. तर ईव्हीएम हॅकिंगसाठी इस्त्राईलचं तंत्रज्ञान वापरल्याचा गंभीर आरोप पवारांच्या राष्ट्रवादीचे हडपसरचे पराभूत उमेदवार प्रशांत जगताप यांनी केलेत. तर विरोधक रडीचा डाव खेळत असल्याचा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय.
महाविकास आघाडीकडून केलेले आरोप निवडणूक आयोगानेही फेटाळलेत. तर ईव्हीएमविरोधातील याचिका दाखल करून घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय.. त्यामुळे महाविकास आघाडी पुराव्यासह कोर्टात जाणार की पुन्हा रस्त्यावरची लढाई लढणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.