महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांच्या बैठकांना वेग आलाय...भाजप आणि शिंदेसेनेत जागावाटपासाठी पहिली स्वतंत्र बैठक झालीय... मात्र नवाब मलिकांच्या नेतृत्वामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला या बैठकीतून वगळण्यात आलयं... त्यामुळे मुंबईत फक्त शिंदेसेना आणि भाजपची युती होणार, हे निश्चित आहे... अशातच महायुतीतही जागावाटपाचा तिढा कायम आहे... मुंबई महापालिकेवर आपलं वर्चस्व राखून सर्वाधिक जागा मिळवण्यासाठी भाजप आणि शिंदेसेनामध्ये रस्सीखेच सुरु आहे...
जागावाटपावरून महायुतीत तिढा?
मुंबईतील 227 जागांपैकी 150हून अधिक जागांवर भाजपचा दावा
मुंबईत शिंदेसेनेकडून 125 पेक्षा अधिक जागांची मागणी
शिंदेसेनेला 70 ते 80 जागा देण्यास भाजप तयार
ठाकरेसेनेतील माजी नगरसेवकांच्या जागा शिंदेंना देण्यास भाजपचा विरोध
मुस्लिमबहुल भागांमध्ये शिंदेसेनेला उमेदवार देण्याबाबत चाचपणी
आठवलेंच्या RPI कडून मुंबईत 10 जागांची मागणी
भाजपची आठवलेंच्या RPIला 2 ते 3 जागा देण्याची तयारी
2017 मधील माजी नगरसेवकांच्या उमेदवारीवर अंतिम निर्णयाची शक्यता
मुंबईत शिंदेसेनेला कमी तर ठाण्यात भाजपला कमी जागा देण्यावर महायुतीत चर्चा सुरु आहे...त्याशिवाय मुंबईत एकत्र आणि ठाणे, कल्याण डोंबिवलीत वेगळे लढण्याचाही प्लॅन तयार करण्यात येतोय...अशातच मुंबई महापालिकेत शिंदेसेना मोठा भाऊ असल्याचं म्हणत मंत्री संजय शिरसाटांनी जागावाटपावरून महायुतीत तिढा असल्याचे संकेत दिलेत...तर महापालिका निवडणुकीत महायुती 150 हून अधिक जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास भाजपचे मंत्री अशिष शेलारांनी व्यक्त केलाय.
विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर मुंबई जिंकण्यासाठी शिंदे सेना आणि भाजपमध्ये स्पर्धा आहे. ठाकरेंच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी महापौर आपल्याच पक्षाचा झाला पाहिजे, यासाठी दोन्ही पक्षांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. जागावाटपाच्या तिढ्यात इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी केल्यास त्याचा कुणाला फटका बसतो... हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.